Subscribe Us

header ads

यंदा ठरणार चंद्रपूर शहराचा 'शहर पक्षी' Chandrapur will be the 'city bird' this year.

चंद्रपूर:-@City Bird Election.
     यंदा चंद्रपूर शहरात 35 वे राज्यस्तरीय पक्षीमित्र  समेलनाचे आयोजन होत असून यानिमित्त 'चंद्रपूर शहर पक्षी' घोषित करण्याच्या दृष्टीने प्रथमच निवडणूक घेण्यात येणार आहे.City Bird Election. ही निवडणूक इको-प्रो संस्था चंद्रपूर शहर महानगरपालिके सोबत संयुक्तपणे घेण्यात येईल. Jointly organized by Eco-Pro and Chandrapur City Municipal Corporation. फेब्रुवारी महिन्यात चंद्रपूरात होत असलेल्या पक्षीमित्र संमेलनाची आयोजन जबाबदारी इको-प्रो संस्थेकडे आहे.Eco-Pro Institute यापूर्वी चंद्रपूरात 2019 ला 19 वे विदर्भ पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन इको-प्रो ने यशस्वीरित्या केले होते.यादरम्यान इको-प्रो ने चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडे ‘शहर पक्षी निवडणुक' घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता.काही कारणास्तव त्यावेळेस हा उपक्रम होऊ शकला नाही. मात्र,राज्य पक्षीमित्र संमेलनाचे निमित्त साधून इको-प्रोतर्फे महानगरपालिका प्रशासक आयुक्त विपिन मुद्दा यांना निवेदन देण्यात आले.यावेळी सदर उपक्रमास होकार देत संयुक्तपणे आयोजन करण्याचे ठरले.ही शहर पक्षी निवडणुक ‘माझी वंसुधरा अभियान’ व 'चंद्रपूर शहर जैवविविधता समिती’ अंतर्गत घेण्यात येणार आहे.
       'चंद्रपूर शहर पक्षी' निवडणूक उपक्रम शहरातील नागरीकांमध्ये पक्षयांचे महत्व,त्याची गरज,एंकदरीत जैवविवीधता संवर्धन,पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने या उपक्रमाला महत्व आहे.या उपक्रमात नागरीक, शाशकीय,निमशासकीय कार्यालये व विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेतला जाणार आहे.शहरात आढळणारे विविध पक्षी व त्यांचे पर्यावरणातील महत्व,त्यांच्या संरक्षणासाठी नागरिकांची भूमिका हे सुध्दा स्पष्ट होणार आहे.यात विविध पक्ष्यांची माहीती, त्यांचे फोटो,प्रचार,प्रसार शहरात ठिकठिकाणी केला जाणार आहे.शाळा-शाळांमधून जनजागृती केली जाणार आहे.
      सदर शहर पक्षी निवडणूक इतर निवडणूक प्रमाणे विवीध पक्ष्यांचे फोटो असलेले बॅलेट पेपरवर गुप्त मतदान पध्दतीने 'चंद्रपूर शहर पक्षी’ निवड केली जाणार आहे.त्यापुर्वी संपूर्ण ठिकाणी व्यापक प्रचार-प्रसार केला जाणार आहे.यामुळे या उपक्रमाला मोठे महत्व असल्याने या पर्यावरणपूरक व व्यापक जनजागृतीच्या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.‘चंद्रपूर शहर पक्षी' निवडणूकीचा निकाल पक्षीमित्र संमेलनात येत्या 11 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर केला जाणार आहे.
City Bird Election.
Jointly organized by Eco-Pro and Chandrapur City Municipal Corporation.
Chandrapur will be the 'city bird' this year.    
                          ---------//--------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या