गडचांदूर:-@korpanalivenews..
कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला Dr.Babasaheb Ambedkar 10 वर्ष पूर्ण झाले.या निमित्ताने 27 जानेवारी रोजी स्मारकाचा 10 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.सर्वप्रथम स्मारकाचे अध्यक्षय कनिष्क ताकसांडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

स्मारक कमिटीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बुद्धवासी कालिदास नारायण डंबारे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सदर कार्यक्रमाला शांती कॉलनी,नांदा व परिसरातील लोकांची उपस्थिती होती.संचालन प्रणय निमसटकर तर आभार कनिष्का ताकसांडे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ करमानकर,बुजडे साहेब,सचिन जुलमे,रूपेश अलोने, मंगेश पाझरे,कैलाश ताकसांडे,सोनू करमानकर यांनी परिश्रम घेतले.

10th Anniversary Celebration of Dr. Babasaheb Ambedkar Memorial...
--------//-------
0 टिप्पण्या