Subscribe Us

header ads

नायलॉन मांजामुळे चिमुकल्याचा मृत्यू.11-year-old boy dies of throat slit.

@Nylon Manja...?
   नायलॉन मांजाला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले.पोलिसांसह संबंधित अन्य विभागांनी धाडी टाकून कारवाया देखील केल्या.मात्र, त्यानंतरही प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर Continued use of banned nylon mats करण्यात येत असल्याचे चित्र आहे.नायलॉन मांजाच्या अतिरेकी वापरामुळे मोठ्या धोक्याची शक्यता वर्तविली जात होतीच,ही शंका खरी ठरली.संक्रांतीच्या पूर्वसंध्येला नको तेच घडले.वडिलांसोबत जात आसताना नायलॉन मांजाने गळा कापल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू 11-year-old boy dies of throat slit झाला.जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली.वेद साहू असे 11वर्षीय मुलाचे नाव आहे.वेद शनिवारी सायंकाळी त्याच्या वडिलांसोबत दुचाकीवर जात होता.अचानक मांजा आला व त्याचा गळा कापला गेला.त्यात तो जखमी झाला होता.आज संक्रांतीच्या दिवशीच त्याचा मृत्यू झाला.गळा कापल्या गेल्याने जखमेने विव्हळत असलेल्या वेदला तातडीने मानकापूर येथील रुग्णालयात नेण्यात आले.मात्र,तेथे उपचार झालेच नाही.अखेर रात्री धंतोलीतील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.जखम गंभीर होती व उपचार मिळायला उशीर झाला.अखेर मकरसंक्रांतीच्या सकाळीच त्याचा मृत्यू झाला.हसतखेळत असलेल्या वेदवर डोळ्यासमोर काळाने घाला घातल्याने पालक व नातेवाईक धक्क्यात आहे.
11-year-old boy dies of throat slit.
                         --------//--------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या