Subscribe Us

header ads

20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती. Recruitment of 20 thousand Anganwadi employees soon.

मुंबई:-@Anganwadi staff..
     राज्यात अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती सुरू करण्यात येईल.त्याशिवाय मानधनवाढीसह नवीन मोबाईल,विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल,असे राज्यचे मुख्यमंत्री "एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.CM Eknath Shinde on Anganwadi Employees Recruitment. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विवीध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 12 जानेवारी रोजी '‘वर्षा’' निवासस्थानी बैठक पार पडली.महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा,मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती,अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विवीध संघटना, समितींचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
        अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी एलआयसी LIC कडे शासनाने 100 कोटी रूपये उपलब्ध करून दिले आहे.यासंर्भातील प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करून संबंधितांना पैसे देण्यासाठी भारतीय जीवन विमा Indian Life Insurance महामंडळाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजार 186 पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून सदर भरती प्रक्रिया 6 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना यावेळी दिले.अंगणवाडी केंद्रासाठी सध्या अस्तित्वात असलेले वर्ग आणि किरायने घेतलेले वर्ग,याचा आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिल्या.
             आढाव्यानंतर महानगरपालिका,नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये हे वर्ग भरविण्याच्या संदर्भात त्यांना आदेश देण्यात येतील,असेही त्यांनी सांगितले. कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता लवकरच देण्यात येईल,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.पोषण आहाराचा दर वाढविण्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच त्यात वाढ होईल,असा विश्वास व्यक्त करताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.दिवाळीपूर्वी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने भाऊबीज दिल्याबद्दल आणि गणवेशाचे पैसे थेट खात्यावर जमा केल्याबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले.या बैठकीत पोषण ट्रॅकर ॲप, मानधनवाढ,रिक्त पदे आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.
Recruitment of 20 thousand Anganwadi employees soon...
Chief Minister Eknath Shinde...  
                            -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या