Subscribe Us

header ads

गृहविभागाने उतरवला ACP विशाल ढुमेचा माज.ACP Vishal Dhume Suspended.

औरंगाबाद:-@ACP Suspended..
           खाकी वर्दीला डाग लावणाऱ्या औरंगाबादचा सहायक पोलिस आयुक्त ACP विशाल ढुमे याला निलंबित करण्याचे आदेश गृह विभागाने निलंबित केले आहे.Assistant Commissioner of Police Vishal Dhume Suspended.विशाल ढुमेंनी महिलेच्या घरात घुसून विनयभंग केला होता. त्यानंतर महिलेच्या नातलगांना मारहाण करत गोंधळही घातला.नागरिकांच्या वाढत्या रोषानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.नागरिकांचा वाढलेला दबाव आणि राजकीय नेत्यांनी केलेला हस्तक्षेप,यामुळे गृहविभागाने त्याला निलंबित करण्याचे आदेश काढले आहे.
            हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या पती-पत्नीला पोलीस अधिकारी असल्याची ओळख दाखवत ढुमे यांनी लिफ्ट मागितली.मात्र त्याच दरम्यान कारमध्ये समोर बसलेल्या महिलेच्या अंगाला स्पर्श करून ढुमेने तिचा विनयभंग केला.घराजवळ येताच पीडितेच्या बेडरूममध्ये जायचा हट्ट धरत ढुमेने नातेवाईकांना मारहाण केली.याच दरम्यान नागरिकांनी 112 वर कॉल करून पोलीस बोलावले असता ढुमे यांनी त्या पोलिसांना देखील धक्काबुक्की केली.मी पोलीस आयुक्तांच्या जवळचा आहे म्हणत ढुमेने शिवीगाळ केली.त्या दिवशी घडलेलेली संपूर्ण घटना घरातील कॅमेऱ्यात कैद झाली तर खाली पोलिसांच्या वाहनात देखील ढुमे गोंधळ घालत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.या साऱ्या घटनेनंतर औरंदगाबाद शहर तापले होते.एसीपी ढुमे याला निलंबित करण्याची मागणी जोर धरू लागली होती.नागरिकांमध्ये कमालीचा रोष होता.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांसमोर गृह विभागाला झुकावं लागलं.गृह विभागाने एसीपी ढुमेला निलंबित करण्याचे आदेश काढले आहे.
        पोलीस अधिकारी ढुमेचे तातडीने निलंबन केले गेले नाही तर 20 जानेवारी रोजी शहर बंदची हाक एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली होती.तसेच विधान परिषदेचे विरोध पक्षनेते अंबादास दानवे यांनीही ढुमेच्या निलंबनासाठी अटोकाट प्रयत्न केले.यानंतर अखेर गृहविभाच्या वतीने ACP ढुमेच्या निलंबनाचा आदेश काढण्यात आला. Assistant Commissioner of Police Vishal Dhume Suspended.          
                        "ढुमेच्या करामती"
        विशाल ढुमे पूर्वी अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत असताना दारू पिऊन नागरिकांना त्रास दिल्याच्या अनेक तक्रारी तत्कालीन अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या होत्या.वाढत्या तक्रारी पाहता वरिष्ठानी खाते अंतर्गत चौकशीचा प्रस्ताव पाठवला होता.अनेकदा वादात सापडले असतानाही औरंगाबाद शहराच्या गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्त पदावर त्यांची वर्णी लागली.
                            -------//-------
                  विशाल ढुमेला बडतर्फ करा.
                        "डॉ.नीलम गोऱ्हे"
महिलेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी औरंगाबादचे सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांना तत्काळ बडतर्फ करावे,अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.राज्यात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे.सहायक आयुक्त ढुमे यांनी महिलेसोबत अश्लील चाळे केल्याचे उघडकीस आले आहे.त्यांनी घरात घुसून पीडित महिलेच्या पती, सासूला शिवीगाळ केली.यासंदर्भात सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ढुमे यांनी यापूर्वी अहमदनगरमध्येही असेच प्रकार केले आहेत. अहमदनगरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांची कार्यालयीन चौकशी लावली होती.याचदरम्यान ढुमे यांची औरंगाबादला बदली झाली.महिलांशी अश्लील,असभ्य वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही.त्यांचे केवळ निलंबन न करता बडतर्फ करण्यात यावे,अशी मागणी डॉ.गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
                           -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,959560811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या