नागपूरः-@BJP Protested..
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षक होते,असे वादग्रस्त विधान करणारे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वक्तव्याचा भाजपने राज्यभर निषेध केला आहे.अजित पवार यांच्या विरोधात नागपूरातही भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.व्हरायटी चौकात महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या विरोधातील बॅनर झळकवत त्यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.महापुरुषांचा अपमान हेच पवारांचे अभियान असल्याचे महिला आघाडीने म्हटले आहे.भाजपच्या वतीने राज्याच्या विवीध भागातही पवार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.बारामतीत तर अजित पवार यांचा पुतळा जाळून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आल्याची माहिती आहे.
Ajit Pawar also protested by BJP in Nagpur.
----------//---------
0 टिप्पण्या