Subscribe Us

header ads

चक्क सरपंच,उपसरपंच पदाचा लिलाव. Auction for the post of Sarpanch, Upasarpanch.

@korpanalivenews..
     ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीत जोरदार चुरस पाहायला मिळते.टोकाची भांडणे होतात. त्याचबरोबर निवडून येण्यासाठी दोन्ही पॅनेलकडून जोरदार प्रयत्न केले जातात.असे असताना मात्र औरंगाबाद जिल्ह्यात वेगळेच प्रकार घडले असून याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतील लिलावाची गोष्ट उघडकीस आली आहे.पैशांची बोली लावून येथे चक्क सरपंच,उपसपंच आणि सदस्यांची पदे विकल्याचा प्रकार समोर आला आहे.14.50 लाखात सरपंचपद तर 4 लाखात उपसरपंचपद त्याचबरोबर सदस्य पदासाठी 70 हजारांपासून 2 लाखापर्यंत बोली लावून पदे विकली गेल्याची खमंग चर्चा आहे.एका व्हिडीओमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला असून उपसरपंचानेच ही भानगड चव्हाट्यावर आणल्याचे अळते.काही टिव्ही चॅनलवर बातम्या सुद्धा प्रसारित झाल्या आहे.लिलाव न पटल्यामुळे राजीनामा देऊन उपसरपंचांनी हा प्रकार उजेडात आणल्याचे बोलले जात आहे.गावाचे कारभारी लिलावातून निवडल्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही.यापुर्वी सुद्धा असे प्रकार उघडकीस आले होते.वेळोवेळी कारवाईची भाषाही वापरली गेली मात्र, पुढे काय झाले ते स्पष्ट होऊ शकले नाही.सदर प्रकरणी आता काय कारवाई होते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
               "ग्रामसभेत जाहीर लिलाव"
गावाच्या मंदिरासमोर ग्रामसभा बोलवून ग्रामपंचायत पदांचा लिलाव केला होता.सरकार दरबारी मात्र ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्याचा बनाव रचण्यात आल्याचे उजेडात आले.मात्र सरपंचपदी निवडून आलेल्या सरपंच पतीने लिलाव झाला नसल्याचे सांगितले आहे.विशेष म्हणजे गावातील नागरिकांकडून लिलावाची जाहीर कबुली देण्यात आली आहे,हे मात्र विशेष.
Auction for the post of Sarpanch,Upasarpanch...
                        ----------//---------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या