Subscribe Us

header ads

‘नाराज’ बच्चू कडू सरकार विरोधात दंड थोपटणार. 'Naraj’ bachchu kadu sarakaravirodhat Dandwate thopatnar.

अकोला:-@bachchu kadu...
          राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहुर्त लागत नसल्याने माजी मंत्री व प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू Bachchu Kadu to field candidate in Election यांची नाराजी वाढत आहे.ही नाराजी आता विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीतून प्रकट होण्याची शक्यता व्यक्त होत असून 30 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे.कडू यांनी आगामी पदवीधर आणि शिक्षकच्या 5 ही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहे.आपल्याला विश्वासात घेतले नसल्याने आपण 5 ही मतदारसंघात उमेदार उभे केले आहे, अशी घोषणा बच्चू कडूंनी केली आहे.त्यामुळे आगामी निवडणूकीत बच्चू कडूंचा प्रहार निवडणूकीच्या रिंगणात सत्ता पक्षालाच आव्हान देणार की काय,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.Naraj’ bachchu kadu sarakaravirodhat Dandwate thopatnar.
              बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की,केवळ अमरावतीच नाही तर शिक्षक आणि पदवीधरच्या 5 ही जागांवर आमचे उमेदवार उभे राहणार आहे.यासाठी मराठवाड्यातून डॉ.संजय तायडे,अमरावतीतून किरण चौधरी,कोकण विभागातून नरेश शंकर कौंडा,नागपूरातून अतुल रायकर तर नाशिकमधून अॕड.सुभाष झगडे असे 5 उमेदवार निवडणूकीत उभे राहतील.1 ते 2 जागा आम्ही निश्चितपणे जिंकणार आहो,असा दावाही कडू यांनी केला आहे.शिंदे गट,प्रहार आणि भाजपा अशी युती करून उमेदवार द्यावेत,अशी विनंती मी त्यांना केली होती.मात्र त्यांचा काही निरोप आला नाही.आम्ही आमचे उमेदवार उभे करणार असल्याची कल्पना मुख्यमंत्री एकनाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती.या निवडणूकांसाठी आम्ही गेल्या 3 वर्षांपासून परिश्रम घेत आहो.3 ठिकाणी आम्ही मोठ्याप्रमाणात मत नोंदणी देखील केली आहे.त्यामुळे आम्ही 5 ही ठिकाणी उमेदवार उभे केले आहे,असेही कडू यांनी सांगितले.
'Naraj’ bachchu kadu sarakaravirodhat Dandwate thopatnar...
                           --------//--------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या