Subscribe Us

header ads

भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा दर्ग्यात. BJP National President J.P. Nadda Darga.

चंद्रपूर:-@J.P. Nadda...
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा JP Nadda यांची लोकसभा प्रवास योजनेंतर्गत 2 जानेवारी रोजी चंद्रपूर येथे जाहीर सभा पार पडली. याच पार्श्वभूमीवर सभेच्या ठिकाणी असलेल्या चंद्रपूर येथील प्रसिद्ध हजरत बाबातुल्लाशाह दर्ग्याला जे.पी. नड्डा यांनी भेट देऊन दर्ग्यावर चादर चढवली.
यावेळी जे.पी.नड्डा यांच्या सोबत राज्याचे वने,मत्स्य व्यवसाय, सांस्कृतीक कार्यक्रम मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. बाबातुल्लाशाहा यांची दुर्गा खरं तर सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.जाहीर सभा झाल्यावर जे.पी.नड्डा हे कार्यकर्त्यांसह थेट दर्ग्यात पोहोचले, त्यांनी चादर देखील चढवली,दर्गा प्रशासनाच्या वतीने त्यांचा स्वागतही करण्यात आला.जेपी नड्डांची हे दर्ग्यात गेले याचे कौतुकच करायला हवा अशी प्रतिक्रिया राकाँचे जितेंद्र आव्हाड व इतरांनी दिली आहे.
BJP National President J.P. Nadda Darga.
                        -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या