Subscribe Us

header ads

जी.आर.इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडतर्फे रक्त दान,डोळे तपासणी शिबीर संपन्न.Blood donation,eye examination camp completed on behalf of GR Infrastructure Limited.

गडचांदूर:-@Korpanalive..
संपूर्ण देशात सुरक्षा सप्ताह सुरू आहे.ठिकठिकाणी विवीध कार्यक्रम आयोजित करून सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृती व मार्गदर्शन करून याविषयी काळजी घेण्याची विनंती करण्यात येत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.याच पार्श्वभूमीवर 15 जानेवरी रोजी कोरपना तालुक्यातील खिर्डी येथे जी.आर. इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या वतीने सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून,सामाजिक बांधीलकी जपत डोळे तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात जवळपास 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले.श्री साईनाथ ब्लड बँक नागपूर यांच्या टीमच्या सहयोगाने रक्तदान शिबीर संपन्न झाली.यावेळी जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील,सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक विष्णू कुंभलकर,खिर्डी ग्रामपंचायतचे उपसरपंच दिपक खेकारे,शर्मा डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर पूनम कुमार अर्जापुरे,ब्लड बँकेचे अनिल ढोणे, भाजपचे आशिष ताजने आणि रक्तदाते उपस्थित होते.
Blood donation, eye examination camp completed on behalf of GR Infrastructure Limited....
                           ------//------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या