Subscribe Us

header ads

दहावी-बारावी परीक्षेत कॉपी टाळण्यासाठी मंडळ कठोर. Board strict to avoid copying in 10th-12th exams.

@10th-12th exams...
         राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या 10 वी,12 वाची परीक्षेसाठी SSC,HSSC Exam New Rules मंडळाकडून कठोर उपाययोजना होणार आहे.12 वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान होणार असून,10 वीची परीक्षा 2 ते 25 मार्च दरम्यान घेतली जाणार तसेच परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी बैठे पथक विशिष्ट शाळांमध्ये पूर्णवेळ हजर राहणार असल्याचे कळते.गेल्यावर्षी काही परीक्षा केंद्रावर मोठ्याप्रमाणात गोंधळ बघायला मिळाला व मोठ्याप्रमाणात कॉपीची प्रकरणे झाल्याचे निदर्शनास आले होते.10th-12th exams.कोरोनाच्या कालावधीनंतर पार पडलेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्येच परीक्षा केंद्र देण्यात आले होते. मात्र,परीक्षेत मोठ्याप्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता.काही केंद्रांवर मुलांना बसण्यासाठी जागा नसल्याने मंडप टाकावा लागला तर काही केंद्रांवर विषय शिक्षकच मुलांना कॉपी पुरवत असल्याची चर्चा होती.त्यामुळे यंदा कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळातर्फे विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती आहे .
      मंडळाचे बैठे पथक विशिष्ट शाळेत पेपरच्या संपूर्ण वेळेत शाळेतच राहणार आहे.या पथकात किमान 4 सदस्य असतील.2 सदस्य प्रत्येक परीक्षा ब्लॉकमध्ये फेऱ्या मारतील तर 2 सदस्य परीक्षा केंद्राच्या आवारात लक्ष ठेवतील.परीक्षा दालनात गैरप्रकार निदर्शनास आल्यास पथकाने त्याची नोंद घेऊन केंद्र संचालकाच्या निदर्शनास आणावी.पोलिसांनाही आवश्यक त्या सूचना देण्यात येणार आहे.परीक्षा केंद्राच्या बाहेर कॉपी पुरविणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती आहे.
Board strict to avoid copying in 10th-12th exams...
SSC,HSSC Exam New Rules..
                            --------//--------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या