गडचांदूर:-@सत्कार...!
महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने चंद्रपूर येथील एनडी ND हॉटेल येथे 8 जानेवारी रोजी ग्रामीण पत्रकार संघाचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला.यामध्ये जिल्ह्यातील इतर तालुकाध्यक्ष यांच्यासह कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष,पत्रकार सैय्यद मूम्ताज़ अली यांच्या निष्पक्ष,निर्भीड,उत्कृष्ट लिखाण व संघाने दिलेली जबाबदारी तालुकाध्यक्ष म्हणून उत्तमरीत्या पार पाडत असल्याची दखल घेत पत्रकार संघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते यांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.Pushpagucch va sanman chinh deun satkar.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गजानन वाघमारे होते तर उदघाटन खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार मुख्य अतिथी तर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सोलापन,महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गजानन वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर,प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे,श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मजहर अली,महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य सचिव राजेश डांगटे,महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य सहसचिव अविनाश राठोड,महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य प्रवक्ता अनंतराव गावंडे इतर मान्यवरांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. याप्रसंगी इतरांसह कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गणेश लोंढे,सचिव प्रवीण मेश्राम, प्रसिद्धी प्रमुख अनिल गेडाम यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सचिव विनोद पन्नास, जिल्हा महासचिव पुरूषोत्तम चौधरी,जिल्हा कार्याध्यक्ष पी.एम.(कुक्कु)सहानी,जिल्हा उपाध्यक्ष अनिल देठे,मार्गदर्शक धर्मेश निकोसे,जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश हांडे,जिल्हा सहसचिव प्रभाकर आवारी, प्रसिद्धी प्रमुख धर्मराज कोवे व सदस्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकार संघाच्या पत्रकार बांधवांची मोठ्यासंख्यने उपस्थिती होती.
Sanman...!
District level gathering of journalists...
He was felicitated with a bouquet of flowers and a badge of honour...
--------//--------
0 टिप्पण्या