गडचांदूर:-@Elgar...
महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मोठे आंदोलन पुकारले होते.आंदोलनाचे नेतृत्व भाजप आमदार गोपीचंद पडळकर,रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी केले होते.नंतर काही दिवसांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी ST संपातून बाहेर पडण्याची भूमिका घेतली.यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे नेतृत्त्व सदावर्ते यांनी केले.एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपल्यानंतर सदावर्ते यांनी 'एसटी कष्टकरी जनसंघ' नावाची कामगार संघटना स्थापन केली.गुणरत्न सदावर्ते विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येतात.असे असताना सदावर्ते यांनी मुस्लिम समाजाचे 'हजरत टिपू सुलतान' व हिंदल वली 'ख्वॉजा गरीब नवाज़' या सुफी संतांबद्दल मुंबईच्या रॅलीत तिव्र शब्दात मिडीयासमोर केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्याचे तिव्र पडसाद उमटले आहे.या वक्तव्यामुळे मुस्लिम समाज व एसटी कष्टकरी जनसंघाचे मुस्लिम सभासद, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहे. 

''गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध''
एसटी कष्टकरी जनसंघाचे नेते ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू,सुफी संतबाबत केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्याचे 30 जानेवरी रोजी ठिकठिकाणी संतप्त पडसाद उमटले असून गुणरत्न सदावर्ते यांचा एसटी कर्मचाऱ्यांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी सदावर्तेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली तर कित्येक ठिकाणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पदांचे राजीनामे सुद्धा दिले आहे.

''सदावर्तेंच्या संघटनेच्या पावत्या जाळल्या''
महाराष्ट्रात सर्व धर्मीय गुण्या गोविंदाने नांदत आहे.मात्र एखाद्या विशिष्ट धर्माच्या धर्मगुरू,मान्यवरांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणे चूकीचे आहे,असे एसटी कर्मचार्यांचे म्हणणे आहे.गुणरत्न सदावर्दे यांनी ख्वॉजा गरीब नवाज़ यांच्या बद्दल केलेले वक्तव्य वादग्रस्त असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटले असून एसटी कर्मचाऱ्यांनी बसस्थानकाच्या आवारात एकत्र येत निषेध व्यक्त केला.तसेच एसटी कष्टकरी जनसंघाच्या पावत्यांची होळी करत सदावर्ते विरोधात मुर्दाबादची घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप संपल्यानंतर गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी 'एसटी कष्टकरी जनसंघ' या नव्या एसटी कामगार संघटनेची स्थापना केली होती.राज्यातील विवीध आगारातील एसटी कर्मचारी या संघटनेचे सदस्य बनले होते.मात्र,त्यांनी केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेच्या पावत्या जाळल्या,पदांचा राजीनामा दिला आहे तर दुसरीकडे मुस्लिम समाजात सदावर्ते विरोधात संतापाची लाट पसरलेचे चित्र पाहायला मिळत आहे.
Elgar of ST employees against Gunaratna Sadavarten...
--------//--------
0 टिप्पण्या