चंद्रपूर:-@Farmers News...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची प्रगती साधावी म्हणून कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करून उत्तुंग भरारी घेण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे.परंपरागत शेती बदलते हवामानात शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण करणारा असला तरी तरूण शेतीपासून दूर जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.अन्न,वस्त्र,निवारा ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी प्रधान देशातील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.शेतीला पूरक जोड व्यवसाय उभारून आर्थिक क्रांती व समृद्धी करण्यासाठी उद्योजक होणे अत्यंत आवश्यक आहे. विदर्भात शेतीमधून अनेक प्रकारचे पिकांचे उत्पादन होते.परंतू प्रक्रिया मूल्यवर्धन साखळी निर्माण करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडत असल्याची खंत आहे.अनेक नोडल एजन्सी विकसीत भागात असल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक व अडचणी येत असल्याचे आपल्या भावनेवरून दिसून आले.हे अंतर कमी करण्यासाठी इतर मागास प्रवर्ग 80 टक्के शेतीवर अवलंबून आहे.मी या आयोगाचा अध्यक्ष म्हणून आपल्या भावना लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी पुढाकार घेईन, अशी ग्वाही पूर्व विदर्भातील शेतकरी उत्पादक कंपनी संचालकाच्या संवाद सभेत राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी व्यक्त केले.

वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनीचे उद्देश, शेतकऱ्यांच्या हितासाठी चळवळ उभी व्हावी, शेतकऱ्यांच्या समस्यांवर शासन स्तरावरून व्यापक निर्णय होण्याची गरज शेतीत वाढत्या गरजा शेतकऱ्या प्रती होत असलेला दुजाभाव यामुळे शेतकरी उत्पादक कंपनी एकत्र येऊन वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक संघाच्या निर्मितीच्या मागील उद्देश विशद करून विदर्भातील शेतकऱ्यांनसाठी न्यायिक भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे मत नरेंद्र जीवतोडे यांनी प्रस्ताविकात व्यक्त केले.सभेच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले संचालक सैय्यद आबीद अली यांनी संघीय शेती व्यवसाय शासनाच्या योजनेची सांगड घालून,शेती उत्पादित धान्य प्रक्रिया साठवणूक विक्री व्यवस्था निर्माण करण्याची गरज व चालला देण्यासाठी वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनीची भूमिका विशद केली.मानव विकास मिशन खनिज विकास निधी जागतीक बँक प्रकल्प इत्यादी शेतकऱ्यांच्या योजना राबवल्या जात असल्या तरी प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकरी उत्पादक कंपन्या गतीशील व शेतकरी हित जोपासण्यासाठी म्हणून नोडल एजन्सी म्हणून शेतकरी उत्पादक संघाच्या पूर्व विदर्भातील वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनी संघाला विदर्भात वाटचाल करण्यासाठी शासनाकडून विदर्भातील लोकांना संधी देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी संचलन यशवंत सहारे यांनी केले.

यवतमाळ,चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक उपस्थित होते. वैनगंगा व्हॅली संचालक सतीश बावणे,बंडू डाखरे, लक्ष्मण गुगल,मंगेश दोनाडकर,नरेंद्र आमने,नितेश पावडे,गणेश वाभीटकर,राजेश केळझळकर यांनी चर्चेत भाग घेऊन अनेक सूचना व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकले.यावेळी अनेक विषयांवर चर्चा करून ठराव पारित करण्यात आले.शासन-प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार बालाजी धोबे यांनी व्यक्त केले.
Farmers need to come forward for industry development.
---------//--------
0 टिप्पण्या