गडचांदूर:-@Leopard Trapped..
कोरपना तालुक्यातील विवीध शेतशिवारात गेल्या अंदाजे 20 ते 25 दिवसापासून एका बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता.तालुक्यातील बेलगाव जामगूडा येथील एका 9 वर्षीय बालकासह काही जनावरांनाही या बिबट्याने ठार केले.यामुळे तालुक्यात कमालीची दहशत पसरली होती.शेती हंगामाचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतीची कामे करावी लागत होती.बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करा,अशी मागणी जोर धरत असतानाच वनविभागाने जागोजागी लावलेल्या पिंजऱ्यांपैकी 4 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास पिपर्डा परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला.Finally,the leopard was trapped in a cage by the forest department.
बिबट्याला पकडण्यासाठी उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांच्या मार्गदर्शनात वनविभागाचे अतिशीघ्र दल, स्थानिक वन कर्मचारी या बिबटच्या लोकेशन वर ट्रॅप कॅमेरे,आणि पिंजरे लावून रात्रंदिवस गटागटात गस्त करीत होते.शेवटी बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला.बिबट जेरबंद झाल्याने वन कर्मचार्यांसह जनतेने सुटकेचा निश्वास सोडला.सदर मोहीम वनपरिक्षेत्र अधिकारी अरूणा चौधरी यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहायक दिनेश चामलवार,वनरक्षक रवींद्र कूनघाटकर,प्रवीण बोभाटे,महादेव जाधव, करिष्मा पाचभाई, सुरेश नल्लूरवार अतिशीघ्र दलाचे वनपाल बी.के.पेंदोर,एस.जी.नगारे,पी.एम मेकेवाड चालक हंसराज दुर्गे,कोरपना,गडचांदूर,पारडी उपक्षेत्रातील वनकर्मचारी तसेच जिवती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे,बल्लापूर येथील क्षेत्र सहायक कोमल गुगलोत यांनी विशेष मोहीम राबवून यशस्वीपणे पार पाडली.
Finally, the leopard was trapped in a cage by the forest department.
-------//--------
0 टिप्पण्या