Subscribe Us

header ads

तो कर्नाटकच्या तुरूंगात भोगतोय शिक्षा.He is serving his sentence in a jail in Karnataka.

गडचांदूर:-@korpanalivenews...
    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालय धमकी प्रकरणात धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांच्या तपासात कर्नाटक येथील बेळगावच्या जेलमध्ये असलेल्या आरोपीने कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे.या आरोपीला खुनाच्या प्रकरणात फाशी झाल्याची माहिती असून नागपूर पोलिसांची एक टीम तिथे पोहचली आहे. जयश कानथा नावाचा हा आरोपी आहे,त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल आहे,पोलिसांच्या मते हा आरोपी जेल मधून पळाला देखील होता,अशी सुद्धा माहिती पुढे येत आहे,पोलिसांनी त्याच्याकडून 1डायरी जप्त केली आणि त्यावरून पुढील तपास सुरू असल्याचे कळते.न्यायालयीन सगळी प्रक्रिया केल्यानंतर आरोपीला ताब्यात घेतला जाईल,त्यासाठी सगळ्या संबंधीत एजन्सी आपल्या परीने तपास करत आहे. "आम्ही कर्नाटक पोलिसांच्या संपर्कात आहो,सध्या हा तपास प्राथमिक स्टेजवर आहे" अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्तांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
He is serving his sentence in a jail in Karnataka.
                         -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या