Subscribe Us

header ads

महाराष्ट्राचे पालक व्हायला आवडेल.I would like to be the parent of Maharashtra.

@korpanalivenews..
        महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.त्यामुळे नवे राज्यपाल कोण ? याबाबतचे आराखडे रंगविले जात आहे.अलिकडेच पंजाबचे माजी मुख्यंमत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्तीची चर्चा सुरू झाली होती.त्यानंतर लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन Former Lok Sabha Speaker Sumitra Mahajan यांचेही नाव पुढे आले."पक्षाने ठरवले तर महाराष्ट्राचे पालक व्हायला आवडेल" असे सूचक संकेतच सुमित्रा महाजन यांनी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.आता वय झाले आहे.पण,नेशन आणि पार्टी फर्स्ट Nation and Party First असल्याचेही त्या म्हणाल्या.त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या राज्यपालपदी नियुक्तीच्या चर्चेला बळ मिळाले आहे.डोंबिवली येथे आयोजित पहिल्या बहुभाषिक पुस्तक आदान-प्रदान सोहळ्यात त्यांची प्रकट मुलाखत झाली.त्यावेळी त्या बोलत होत्या.
    इंदूरच्या 8 वेळा खासदार राहिलेल्या लोकसभेच्या माजी अध्यक्षा महाजन यांची एका पत्रकाराने मुलाखत घेतली असता त्या म्हणाल्या की,स्वामी विवेकानंद यांनी "भारत हा विश्वगुरू होणार" हे सांगितले.आपल्या देशाची प्रगती सध्या याच पथावर आहे.आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका महत्त्वाची आहे.ठामपणे निर्णय घेतले जात आहे. त्यामुळे भारताबद्दल आदर निर्माण झाल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.या मुलाखतीत त्यांनी नगरसेविका ते लोकसभा अध्यक्षपदाचा प्रवास उलगडला.
                      "जबाबदारी वाढली"
           लोकसभेचे अध्यक्षपद भूषवताना वेगवेगळ्या राज्यातील खासदारांबरोबर संवाद साधताना अडचण वाटली नसल्याचे महाजन यांनी सांगितले.लोकसभा अध्यक्षपदाचा पदभार सांभाळल्यावर जबाबदारी वाढली.अशावेळी कशाप्रकारे अभ्यास केला,याचाही अनुभव महाजन यांनी सांगितला.त्यांनी इंदूरमधील अहिल्याबाई स्मारकाची माहितीही दिली.देशाची प्रगती साधण्याची जबाबदारी केवळ राजकीय नेत्यांची नाही,तर नागरिकांचीही आहे.आपण निवडून दिलेला नेता चुकीचे वागत असेल,तर मतदारांनी त्याला त्याची जाणीव करून दिली पाहिजे.आजकाल देवालाही वाटून घेतले जाते,तसेच मोठ्या माणसांनाही वाटून घेतले जात आहे,हा चुकीचा पायंडा आहे,असे त्या म्हणाल्या.
Nation and Party First..
I would like to be the parent of Maharashtra...
                         --------//--------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

                   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या