Subscribe Us

header ads

एक सजग अभ्यासू पत्रकार गमावला.A conscientious journalist has been lost.

मुंबई'@journalist...
      दूरदर्शनचे पहिले वृत्त निवेदक,पुणे तरूण भारतचे माजी संपादक,सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनचे संस्थापक,राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य संचालक डॉ.विश्वास मेहेंदळे यांच्या निधनाने एक जाणता पत्रकार आणि अभ्यासू लेखक आपण गमावला आहे,अशा शब्दात वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री 'सुधीर मुनगंटीवार' यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.ते पुढे म्हाणाले की,डॉ.विश्वास मेहेंदळे यांनी प.पू.डॉ.हेडगेवार ते का.सुदर्श अशा क्रमशः 5 सरसंघचालकांच्या चरित्र आणि कार्यावर "5 सरसंचालक” हे पुस्तकही लिहिलं आहे.स्वतंत्र पत्रकाराच्या नजरेतून या पुस्तकात त्यांनी संघकार्याच्या दीर्घकाळाचा रोचक आढावा घेतला आहे.स्व.मेहेंदळे यांनी लिहिलेली विवीध पुस्तके, त्यांनी घेतलेल्या मुलाखती,दूरदर्शनसाठी त्यांनी निर्मिलेले अनेक वृत्रपट यातून त्यांची अभ्यासू वृत्ती उठून दिसली.राज्याचे सांस्कृतिक कार्य संचालक म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला होता.एक सजग पत्रकार म्हणून राजकीय क्षेत्रासोबतच त्यांचा राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राचा अभ्यास स्तिमित करणारा होता,त्याचबरोबर ते एक चांगले वक्ताही होते, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.डॉ.विश्वास मेहेंदळे यांना ईश्वर सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो,अशी प्रार्थनाही सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
A conscientious journalist has been lost....
                         --------//--------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या