Subscribe Us

header ads

गडचांदूरात मार्कंडेय जन्मोत्सव सोहळा व सत्कार समारंभ. Markandeya birth anniversary celebration and felicitation ceremony in Gadchandur.

गडचांदूर:-@korpanalivenews..
      कोरपना तालुका पद्मशाली समाजाच्या वतीने 24 जानेवरी रोजी चिरंजीव भगवान श्री महर्षी महामुनी मार्कंडेय जन्मोस्तव सोहळा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुभाष धोटे होते तर उद्घाटन नगराध्यक्षा सौ. सविता टेकाम यांनी केले.प्रमुख अतिथी म्हणून जनरल मॅनेजर माईन्स सुनील अल्लेवार यांची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान मार्कंडेय महाराज,आचार्य कोंडा बापु लक्ष्मण यांच्या प्रतिमा पुष्पहार अर्पण, दीपप्रज्वलन करून आरती करण्यात आली. Organization of Markandeya birth anniversary celebration and felicitation ceremony.
याप्रसंगी सेवानिवृत्त उपप्राचार्य,जीवन गौरव पुरस्कार प्राप्त प्रा.विजय आकनूरवार,सेवानिवृत्त औषध निर्माण अधिकारी विजय रेब्बावार,सेवानिवृत्त कालवा निरीक्षक राजेश परसावार यांचा सपत्नीक समाजाच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच पल्याड चित्रपट Palyad movie दिग्दर्शक अनिकेत परसावार यांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
      अमदार सुभाष धोटे यांनी अध्यक्षीय स्थानावरून मार्गदर्शन करताना सदर मेळाव्या आयोजित करून एक चांगला उपक्रम सुरू केला याबद्दल पद्मशाली समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश बेतावार व प्रा. विजय आकनुरवार आणि त्यांच्या समस्त सहकार्‍यांचे अभिनंदन केले.आचार्य कोंडा बापु Acharya Konda Bapu यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या प्रगतीसाठी समाजाला संघटीत करावा, महिलांनी सुद्धा संघटीत होवून समाजासाठी जेवढा काही करता येईल तो करण्याचा प्रयत्न करावा आणि एखादी जागा जर मिळाली तर एक चांगला समाज भवन Samaj Bhawan निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार सुभाष धोटे MLA Subhash Dhote यांनी यावेळी दिली तसेच समाज बांधवांना संत मार्कंडेय महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.संचालन प्रा.अतुल अल्लेवार, प्रास्ताविक सतीश बेतावार तर आभार संजय कोंडबत्तुलवार यांनी व्यक्त केले.सदर कार्यक्रमात पद्मशाली समाज बांधवांची मोठ्यासंख्यने उपस्थिती होती.
Markandeya birth anniversary celebration and felicitation ceremony in Gadchandur...
                           -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या