Subscribe Us

header ads

बंडखोरांसाठी आमचे दरवाजे बंद.Our doors are closed to rebels.

मुंबईः-@Sanjay Raut...
       शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आत्मपरिक्षण केल्यास शिवसेना एकसंघ होऊ शकेल, असे मत शिंदे गटाचे प्रवक्ते व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले होते.त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर पलटवार केला.MP Sanjay Raut on Deepak Kesarkar Statements.दोन्ही गट एकत्र यावे,असे वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करावे,असा सल्ला देताना केसरकर यांनी एकत्र येण्याची केलेली भाषा हे त्यांच्या गटातील वैफल्य आहे,असा दावाही राऊत यांनी केला आहे.बंडखोरांसाठी शिवसेनेची दारे बंद आहे,असेही खासदार संजय राऊत म्हणाले.Our doors are closed to rebels.
       फ्रेब्रुवारीमध्ये सरकार पडेल,आम्ही बोललो होतो. त्यामुळेच केसरकर आता एकत्र येण्याची भाषा करत आहे.आमची कायदेशीर बाजू भक्कम असून लवकरच 16 आमदार अपात्र ठरतील,असे राऊत म्हणाले.संजय राऊत म्हणाले की,दोन्ही गट एकत्र यावे असे वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करायला पाहिजे. केसरकरांनी यांच्या विधानावरून त्यांच्यात आणखी काही गट निर्माण झाल्याचे दिसते.अब्दुल सत्तार यांनीही त्यांच्या लोकांवर आरोप केले आहे.यावरून त्यांच्या गटात काय सुरू आहे,हे लक्षात घ्या.हे सरकार जास्त काळ टिकणार नाही व हा गटही टिकणार नाही. यापैकी बरेचशे लोक भाजपत जातील व तेच त्यांचे अंतिम ध्येय आहे.कारण त्यांना आता शिवसेना स्वीकारणार नाही,असे संजय राऊत म्हणाले.
Our doors are closed to rebels.
He should do self-examination. "Sanjay Raut"
                             -------//-------
   
 मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या