गडचांदूर:-@Suicide..?
एका व्यक्तीने दोरीच्या सहाय्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 3 जानेवारी रोजी गडचांदूर येथे समोर आली आहे.प्रमोद गदेकर वयवर्ष अंदाजे 42 असे मृत व्यक्तीचे नाव असून तो माणिकगड सिमेंट कंपनीत एका कंत्राटदाराकडे कामाला होता.त्याच्या पश्चात पत्नी व 16 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलगी असे दोन मुले असून घटनेच्या वेळी पत्नी घरी नव्हती आणि दोन्ही मुले शाळेत गेले होते.घटनेचे कारण अस्पष्ट असतानाच मानसिक तणावातून सदर व्यक्तीने आत्महत्या केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.तो येथील तलाठी कार्यालयासमोर एका घरात किरायाने पत्नी व दोन मुलांसोबत राहत होता.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून शव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले आहे. ठाणेदार सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

A person ended his life journey by hanging himself at his residence...
Discussion of suicide due to mental stress...
--------//--------
0 टिप्पण्या