गडचांदूर:-@Humanity..?
देशात हल्ली काही जातीयवादी शक्तींकडुन धर्माच्या नावावर समाजात तेढ निर्माण केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.यामुळे देशाच्या एकात्मतेला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सर्व धर्मीय समाज बांधव गुण्यागोविंदाने नांदत असतानाच जातीपातीचे द्वेष पसरवण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून युद्धपातळीवर सुरू असतानाच 11 जानेवरी रोजी चंद्रपूर येथे माणुसकीचे अप्रतिम दर्शन घडले आहे.हे प्रकरण हिंदू-मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करणाऱ्यांना चपराकच म्हणावी लागेल.
सविस्तर असे की,चंद्रपूर येथील रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत PSI रोशन इरपाचे हे सपत्नीक चंद्रपूर येथे राहतात.यांच्या पत्नीला 9 वा महिना सुरू झाल्याने हॉस्पिटल मधून फोन आला की,तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन हॉस्पिटलला Hospital या.!पोलीस भरती सुरू असल्याने वरिष्ठांना याविषयी माहिती देऊन त्यांच्या परवानगीने ते हॉस्पिटलला गेले.डॉक्टर यांनी सांगितले की,तुमच्या पत्नीचे हिमोग्लोबिन 7. आहे.Hemoglobin.त्यामुळे डिलेव्हरीला प्रॉब्लेम येऊ शकतो.पत्नीचा रक्तगट O+ Blood Group O+ असल्याने तुम्ही त्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करा Settlement at the earliest.
PSI रोशन यांचे चंद्रपूर शहरात कोणी नातेवाईक नाही.अशातच यांनी तुषार नामक मित्राला फोन लावून अडचण सांगितली.त्याने 10 मिनिटात कॉल बॅक केला आणि सांगितले की,दादा O+ ब्लड डोनर ची व्यवस्था झाली.लगेच यांनी ब्लड बँक Blood bank कडे धाव घेतली आणि तिथे पुरूष ब्लड डोनरला शोधू लागले. तर तिथे कोणी पुरूष डोनर दिसत नव्हता.फक्त एक मुस्लिम मुलगी दिसत होती.यांनी तिला हिम्मत करून विचारले,आपण ब्लड देण्यासाठी आले आहेत काय? तिने लगेच हो म्हटले आणि तुषारचे नाव सांगितले.हे ऐकुण यांना आश्चर्यचा धक्का बसला.''कारण मी मुलींना सहज रक्तदान Blood Donate करताना बघीतले नाही' आणि ही ताई माझ्या अगोदर जाऊन ब्लड डोनेटसाठी तयार होती'' असे psi रोशन यांनी म्हटले असून विश्वास बसत नव्हता म्हणून यांनी तिला आणखी विचारले तर ती म्हणाली की,माझे नाव "फातिमा" आहे.आणि मी हकीम यांची बहीण आहे. माझे भाऊ हकीम हे गरजू लोकांना ब्लड डोनेट करण्याचे काम करतात,त्यांची चंद्रपूर शहरात एक चैन आहे.हकीम भैय्यानी मला सांगितले की एका पोलीस ऑफिसरच्या पत्नीला ब्लडची गरज आहे,त्यासाठी तू स्वतःच जा आणि मी लगेच आले.Fatima donated blood to a Hindu woman..!
"आजकाल T.V. वर फक्त हिंदु मुस्लिम याच विषयावर चर्चा जाणीपूर्वक घडवून आणताना दिसत असताना तसेच सोशल मीडियावर Social media सुद्धा लोक हिंदू-मुस्लिम मध्येच भारताची विभागणी करत असताना चंद्रपूर सारख्या शहरात हकीम भैय्या आणि त्यांची भगिनी फातिमा हे कोणतेही जातीय भेदभाव न करता आपले रक्त Blood गरजू लोकांना दान Donate करून हे सांगून पाहत आहे की,हिंदु-मुस्लिमचे रक्त एकच आहे,त्यामध्ये कोणताही फरक नाही,आपण उगीच जातीय भेद बाळगत आहो, फातिमा दीदी आणि हकीम भैया सलाम तुमच्या कार्याला" अशा शब्दात psi रोशन यांनी मत व्यक्त केले आहे. यावर फातीमा यांनी सांगितले की,"आमचा फक्त एकच धर्म,तो आहे माणुसकी.

"ये देख हिंदु का खुन,ये देख मुसलमान का खुन, बता कोनसा हिंदू का,कोनसा मुसलमान का ? बनाने वालेने इसमे फरक नही किया तो, हम कोण है फरक करणे वाले" नाना पाटेकर यांचा हा डायलॉग यावेळी तंतोतंत खरं ठरला,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
One Religion "Humanity"...
Fatima donated blood to a Hindu woman..!
--------//-------
0 टिप्पण्या