Subscribe Us

header ads

रिपब्लिकन क्रांती लॉंगमार्चचे भिमा कोरेगाव येथून सुरूवात. The Republican Revolution Long March started from Bhima Koregaon.

भिमा कोरेगाव:-@Long March...
       "बाबासाहेबांची राजकीय विचारधारा ही केवळ बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात आहे.आम्ही बाबासाहेबांच्या विचारधारेवर काम करतो असे सर्व सामान्य कार्यकर्त्यांना भावनिकतेचे आवाहन करीत नानाविध संघटनेतून कार्य करणारे बाबासाहेबांच्या एकसंघ संघटन शक्तीला छिन्नविछिन्न करीत असून आणि दिवसेंदिवस बाबासाहेबांनी योजलेल्या प्रबुद्ध भारतच्या निर्माण प्रक्रियेपासून निव्वळ भटकंती करीत आहे आणि ही बाबासाहेबांची राजकीय विचारधारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विना परिपूर्ण होऊ शकत नाही." असे प्रतिपादन पुज्य भंते ज्ञानज्योती,संघरामगिरी यांनी व्यक्त केले.ते बाबासाहेबांनी स्थापन केलेला "रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया" या पक्षात लोकशाहीचा देखावा उभा न करता बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या पक्ष संविधानानुसार पक्ष चालविण्यात यावा.यासाठी "भिमा कोरेगाव शौर्यदिना" चे औचित्य साधून 1 जानेवारी 2023 पासून भिमा कोरेगाव येथून सुरू करण्यात आलेल्या "रिपब्लिकन क्रांती लॉंगमार्च" च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.हा क्रांती लॉंगमार्च संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करण्यासाठी भ्रमण करणार आहे.
        सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर जिल्हा अहमदनगर येथील धम्मपद मॉनेस्ट्रीचे अध्यक्ष प्रसिद्ध समाजसेवी सुधाकर नगरे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवानंद लांजेवार अमरावती,संचालन अशोककुमार उमरे  गडचांदूर चंद्रपूर यांनी तर आभार शिल्पाताई सोनवणे यांनी व्यक्त केले.तद्नंतर विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन रिपब्लिकन क्रांती लॉंगमार्चच्या धेय्य व उद्दिष्टांवर चर्चा करून सायंकाळला धम्मपद मॉनेस्ट्री पारनेर जिल्हा अहमदनगरकडे लॉंगमार्चचे प्रस्थान करण्यात आले.
The Republican Revolution Long March started from Bhima Koregaon.
                     --------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.90493586999595630811.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या