Subscribe Us

header ads

सार्वजनिक शौचालयात सुविधांचा अभाव. Sarvajanika shauchalayat suvidhannca abhava.

गडचांदूर:-@korpanalivenews.
    गडचांदूर येथील वार्ड क्रमांक 6 येथे नगरपरिषदेने वार्डवासीयांसाठी सार्वजनिक शौचालय बांधले.मात्र याठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्याप्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.विद्युत व्यवस्था असताना लाईट बंद असतात.अंधार असल्याने महिलांना रात्रीच्या सुमारास शौचालयात जाणे कठीण झाले आहे.याठिकाणी स्वच्छता नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मुख्य म्हणजे या वार्डात सत्ताधारी व विरोधी असे दोन नगरसेवक आणि शौचालयाच्या हाकेच्या अंतरावर नगराध्यक्षा राहतात,असे असताना या सर्वांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप करण्यात आले आहे. नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी नागरिकांची समस्या मार्गी लावावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे शहर सचिव संतोष पटकोटवार आणि वॉर्डातील नागरिकांनी केली आहे.आता याविषयी नगरपरिषद काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sarvajanika shauchalayat suvidhannca abhava.
                        --------///---------  
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049356899,9595630811.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या