Subscribe Us

header ads

श्री हनुमानजी महाअभिषेक पूजा,श्री शंकरजी मुर्ती प्राणप्रतिष्ठा.Shri Hanumanji Mahaabhishek Pooja, Shri Shankarji Murti Pranpratistha.

गडचांदूर:-@korpanalive..
           जय बजरंग सार्वजनिक बहुउद्देशीय संस्था गडचांदूरतर्फे 7,8,9 जानेवारी असे सलग 3 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.श्री हनुमानजी महाअभिषेक पूजा,श्री शंकरजी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम येथील वार्ड क्रं.6 श्री हनुमान मंदिर देवस्थान येथे होणार आहे.यामध्ये 7 जानेवारी शनिवार रोजी सकाळी 7 वा.श्री हनुमानजी आरती व पूजा,8 वा. स्वच्छता अभियान,11 वा.ह.भ.प.किन्नाके महाराज गडचांदूर यांचे कीर्तन,दुपारी 3 वा.श्री शिवशंकर मूर्ती मिरवणूक,रात्री 8 ते पहाटेपर्यंत भारूड कार्यक्रम.8 जानेवारी रविवार रोजी पहाटे 4 श्री हनुमानजी महाभिषेक पूजा,शिवशंकरजी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व पूजा,सकाळी 8 वा.भाजन,11 वा.ह.भ.प.विलास कुळसंगे महाराज बेला यांचे कीर्तन,दुपारी 3 वा.ह.भ. प.कल्पनाताई कांबळे पल्लेझरी यांचे कीर्तन, रात्री 8 वा.सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकजपाल महाराज यांचा कार्यक्रम तसेच 9 जानेवारी सोमवार रोजी सकाळी 7 वा.श्री हनुमानजी आरती व पूजा,8 वा.श्री स्वामी चैतन्य महाराज वढा यांची भव्य स्वागत मिरवणूक व रथ यात्रा,दुपारी 1 वा.परमपुज्य ह.भ.प.संत श्री स्वामी चैतन्य महाराज यांचे जाहीर प्रवचन व दहीहंडी कार्यक्रम,3 वा.आभार प्रदर्शन  यानंतर महाप्रसाद,अशाप्रकारे कार्यक्रमाची रूपरेषा असून समस्त भाविक भक्त जनतेने उपस्थिती दर्शवून श्री हनुमानजी कृपेचा लाभ घ्यावा अशी विनंती वजा आवाहन जय बजरंग सार्वजनिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
Shri Hanumanji Mahaabhishek Pooja, Shri Shankarji Murti Pranpratistha.
                         --------//--------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या