चंद्रपूर:-@Gold Medal...
महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी,कर्मचाऱ्यांमधील क्रीडा कौशल्याला वाव मिळावा तसेच आरोग्य चांगले राहावे,त्यांचे मनोबल वाढावे,या उद्देशाने पुणे येथे 33 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यातत आले होते.Maharashtra State Police Sports Competition.या स्पर्धेत राज्यातील 3200 पोलीसांनी एकूण 18 क्रीडा प्रकारात फार चुरशी,खेळाडू वृत्तीने सहभाग घेतला होता.यामधून चंद्रपूर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी समोर आली असून जिल्ह्याचा कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत राखण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे असे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक "रविन्द्रसिंह संतोषसिंह परदेशी" यांनी "पिस्टल फायरिंग" मध्ये ग्रुप इन या प्रकारात "सुवर्ण पदक" Gold Medal पटकावला आहे.राज्याचे पोलीस महासंचालक "रजनीश सेठ" यांच्या हस्ते त्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

आपल्या दैनंदिन कर्तव्यात पोलिसांना अनेकदा ताणतणावाचा सामना करावा लागतो,त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी अशाप्रकारच्या स्पर्धांचे आयोजन होणे महत्वाचे असून पोलीस दलातील क्रिडापटूंसाठी देखील अशा स्पर्धा उपयुक्त ठरतात.यामुळे त्यांना राष्ट्रीय स्पर्धेतही कौशल्य दाखविण्याची संधी मिळते. राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पोलीस दलातील अधिकारी,कर्मचारी पदके मिळवतात,देशाचे नाव मोठे करतात.अशा खेळाडूंना वाव देण्यासाठी सुद्धा अशा स्पर्धांना महत्व आहे.

33rd Maharashtra State Police Sports Tournament at Pune....
SP of Chandrapur win the gold medal....
--------//--------
0 टिप्पण्या