Subscribe Us

header ads

सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट.Supriya Sule's sari caught fire.

@Korpanalive:- अनर्थ टळला...
  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांच्यासोबत एक मोठा अनर्थ होता होता टळला major disaster was averted.झाले असे की, पुण्यातील एका कार्यक्रमात event in Pune छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला statue of Chhatrapati Shivaji Maharaj हार अर्पण करताना तिथे असलेल्या समईमुळे सुप्रिया सुळे यांच्या साडीला अचानक आग लागली.वेळीच हा प्रकार लक्षात आला.सुदैवाने ही आग मोठी नव्हती आणि तात्काळ विझविण्यात यश आले.यामुळे अनर्थ टळला. या अनपेक्षित प्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली.पण,तत्परतेने आग विझविण्यात आल्याने साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला.या घटनेचा व्हीडिओ समाज माध्यमांवरून व्हायरल झाला आहे. त्यावर सूचक प्रतिक्रियाही उमटत आहे.
    पुण्यातील हिंजवडी भागामध्ये एका कराटे कोचिंग क्लासच्या उद्घाटनासाठी खासदार सुप्रिया सुळे यांना बोलावण्यात आले होते.सर्व पाहुणे एकत्र आल्यानंतर उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पोहोचले.यावेळी टेबलावर ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करताना तिथे ठेवलेल्या दिव्याने सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागली.या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे.यात त्यांच्या साडीच्या पदराला आग लागल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.सुदैवाने यात सुप्रिया ताईंना कुठलीही हानी पोहोचली नाही आणि तात्काळ आग विझविण्यात आली.विशेष म्हणजे या घटनेमुळे सुप्रिया सुळे जराही विचलित झाल्याचे दिसले नाही.त्यांनी धैर्यपूर्वक संपूर्ण परिस्थिती हाताळली.त्यांनी दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवादही साधला. सुदैवाने आग लागल्याचे वेळीच कळले आणि मोठा अनर्थ टळला.
Supriya Sule's sari caught fire.
                          -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या