Subscribe Us

header ads

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी. Taluka Level Science Exhibition..

गडचांदूर:-@Science Exhibition..
        गडचांदूर येथील स्व.भाऊराव पाटील चटप आश्रमशाळा येथे नुकतीच 50 वी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी Science Exhibition पार पडली. यात नांदाफाटा येथील "एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल" च्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून यश संपादित केले.Nandaphata Eklavya English School Top.
2022-23 शैक्षणिक वर्षासाठी 10,11,12 जानेवरी, अशी कोरपना तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी आदिवासी व गैर आदिवासी,गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत कोरपना तालुक्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या. शैक्षणिक साहित्यातील उच्च प्राथमिक विभागातील गैर आदिवासी क्षेत्रामधील गटांमध्ये एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल नांदाफाटा या शाळेने सहभाग नोंदविलेला होता.यामध्ये संजित प्रशांत मसे व पूर्वा पंढरीनाथ वासेकर या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ''अप्लिकेशन ऑफ ट्रिगोनामेट्री'' Application of Trigonometry या प्रतिकृतीने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.

यावेळी कोरपना तालुका गटशिक्षणाधिकारी रूपेश कांबळे,विस्तार अधिकारी सचिन मालवी,केंद्र प्रमुख पंढरीनाथ मुसळे,एकलव्य इंंग्लिश मिडीयम स्कूलचे संचालक प्रा.आशिष देरकर,मुख्याध्यापक नितेश शेंडे यांनी सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका संध्या पिंगे,स्नेहल लोढे,शिक्षक अमित वाघमारे यांचे अभिनंदन केले.जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवून उज्वल यश मिळवण्याचा संकल्प संजित मसे व पूर्वा वासेकर या विद्यार्थ्यांनी केला आहे.
Taluka Level Science Exhibition..
Nandaphata Eklavya English School Top..
                            -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या