Subscribe Us

header ads

गडचांदूर शहर भाजपच्या वतीने TB रुग्णांना 'सकस आहार किट' वितरण. Gadchandur City Distribution of 'Diet Kit' to TB patients on behalf of BJP.

गडचांदूर:-@TB Mukt Bharat...
        देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत अभियानाला Tuberculosis Free India Campaign सुरूवात झाली आहे.या अभियानाला प्रतिसाद देत गडचांदूर शहर भाजपच्या वतीने गडचांदूर येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथे TB रूग्णांना सकस आहार किटचे वाटप करण्यात आले.यानंतर सुद्धा जे काही TB चे रूग्ण निघतील त्यांनाही 6 महिन्यांसाठी दत्तक adoption घेऊन सकस आहार देण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला
     तसेच संपुर्ण भारत TB मुक्त करण्यासाठी हातभार लावू अशी ग्वाही सुद्धा यावेळी भाजपच्या वतीने देण्यात आली.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल टेम्भे,गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीष उपलेंचवार,माजी नगरसेवक नीलेश ताजने,नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे,जेष्ठ नेते संदीप शेरकी,शिरीष बोगावार,प्रतीक सदनपवार यांच्यासह आरोग्य कर्मचारी,आशा वर्कर ताईंची उपस्थिती होती.
-----------------------------------------------------------------
         ''माणिकगड सिमेंटकडून मदत नाही''
कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट,दालमिया सिमेंट कंपन्यांच्या माध्यमातून पोषक आहार किट Diet Kit देऊन सहकार्य मिळाले.पण,गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनीच्या CSR डिपार्टमेंटच्या संबंधित अधिकाऱ्याला वारंवार फोन करूनही त्यांच्याडून कोणतेही सहकार्य help होत नाही.अशी प्रतिक्रिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल टेम्भे यांनी सदर प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर दिली.
Gadchandur City Distribution of 'Diet Kit' to TB patients on behalf of BJP. 
                          -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या