चंद्रपूर:-@Mock drill...
दहशतवाद आणि दहशतवाद्यांना धर्म नसतो,कट्टरता आणि द्वेषाच्या मानसिकतेतून दहशतवादाचा जन्म होत असतो ? असे असताना मात्र एखाद्या विशिष्ट समाजालाच दहशतवादी ठरविण्याचे चित्र निर्माण तर केले जात नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या आठवड्यात चंद्रपूर पोलिसांनी मॉकड्रील (दहशतवादी हल्ल्याचे मॉकड्रील)करताना अतिरेकी,हा एक मुस्लिम असल्याचे दाखवले होते.तसेच अतिरेकी झालेल्या पोलिसांनी ''अल्लाहु अकबर’' अशा घोषणा दिल्या होत्या.पोलिसांनी मॉकड्रिल रिहर्सल(रंगीत तालीम)Mock drill rehearsal मधून मुस्लिम धर्माची बदनामी केली,यामुळे मुस्लिम समाजाने तीव्र नाराजी व्यक्त करत स्थानिक वकील व मुस्लिम समाज बांधवांनी पोलिस अधीक्षकाकडे तक्रार केली.याच पार्श्वभूमीवर रामनगर पोलिस स्टेशन येथे 22 जानेवारी रोजी पोलिस विभागातर्फे मस्जिद पदाधिकारी व मुस्लिम धर्मगुरू,मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांची एक बैठक आयोजित करण्यात आली.
पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी व अतिरिक्त पोलिस अधीक्षक रीना जनबंधु यांच्या मार्गदर्शनात आयोजित सदर बैठकीत उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार,पोलिस निरीक्षक सुधाकर अंबूरे,यांची उपस्थिती होती.यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांनी मॉकड्रिल विषयीसंदर्भात संपूर्ण माहिती देत "समाजाच्या भावना दुखावण्याचा पोलिस प्रशासनाचा हेतू नव्हता, अनावधानाने या नारेबाजीचा प्रकार घडला पोलिस प्रशासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो" असे म्हणत "भविष्यात पुन्हा असे प्रकार घडणार नाही" अशी ग्वाही दिली.
कोणत्याही ठिकाणी काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला कसे समोर जायचं,यासाठी मॉकड्रिलची रिहर्सल (रंगीत तालीम)पोलिस विभागाकडून घेतली जाते.मॉकड्रिल रिहर्सल दरम्यान अनइंटेशनली Unintentionally हा प्रकार घडला असला तरी याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. पोलिस विभागाकडून कधीही दूजाभाव Partiality केला जात नाही,असे स्पष्टपणे सांगून दिलगिरी व्यक्त केली व पोलिस विभागातर्फे माफी मागितल्याने बैठकीत उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले.आपला चंद्रपूर जिल्हा हा,शांतताप्रिय जिल्हा आहे,सर्वधर्म समभावमुळे या जिल्ह्याचे नावलौकिक असल्याने सर्वांनी शांतता कायम ठेवावी,अशी विनंती बैठकीत उपस्थित मान्यवरांनी केली तर आम्ही सर्व आपल्या जिल्ह्याची शांतता कायम ठेवण्यास सर्वोत्तपरी प्रयत्न करू अशी ग्वाही उपस्थितांनी यावेळी दिली. अनावधानाने घडलेल्या या प्रकारचे कोणीही वेगळे अर्थ काढू,नये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची विनंती यावेळी करण्यात आली.
Mock drill rehearsal...
This will not happen in the future...
-------//------
0 टिप्पण्या