Subscribe Us

header ads

वर्गात शिरून अल्पवयीन मुलीवर लग्नासाठी दबाव.Underage girl pressured into marriage by entering class.

@korpanalivenews..
     शाळा सुरू असताना एका युवकाने चक्क वर्गात शिरून उपस्थित विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यास सांगितले.विद्यार्थी बाहेर पडत असताना एका मुलीला थांबून "तुला माझ्यासोबत लग्न करावेच लागेल" अशी धमकी देत विनयभंग करून निघून गेला.ऐन प्रजासत्ताक दिनी पुन्हा तिची वाट अडवून लग्नासाठी दबाव टाकला.एखाद्या चित्रपटातील हा प्रसंग वाटावा अशी ही घटना धामणगाव तालुक्यात घडली आहे. एकतर्फी प्रेमातून One Sided Love ही घटना घडल्याचे सांगण्यात येत असून आरोपी सतत त्रास देत असल्याने मुलीने याप्रकरणी आईला माहिती दिली असता आईने थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी आरोपी चेतन वयवर्ष 26 रा. जळका पटाचे ता.धामणगाव,याच्याविरूद्ध विनयभंग, धमकी,पोक्सो व ॲट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.Underage girl pressured into marriage by entering class.
       पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार,तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पीडिता राहते.26 जानेवारी रोजी दुपारी 12 च्या सुमारास 13 वर्ष 9 महिने वयाची पीडित विद्यार्थिनी शाळेतून घरी परतत असताना सदर आरोपी दुचाकीने मागून आला. रस्ता अडवुन "तुझे फोटो काढून मला पाठव,नाही पाठविले तर घरी येऊन मारेन" अशी धमकी तिला दिली.तसेच 15 दिवसापुर्वी सुद्धा आरोपी हा पिडीतेच्या शाळेत जाऊन तिच्या वर्गात शिरला होता. वर्गातील मुला,मुलींना बाहेर काढले. "आपल्या सोबत लग्न कर" असे तो दरडावणीच्या सुरात म्हणाला, पीडीतेने त्याला नकार दिला असता,तो तेथून निघून गेला.26 जानेवारी रोजी देखील त्याने छेडखानी केल्याने ही बाब तिने आईला सांगितली.तिच्या आईने तिला घेऊन पोलिस ठाणे गाठले...
Underage girl pressured into marriage by entering class...
                         -------//-------
 मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या