Subscribe Us

header ads

कोलाम विकास फाउंडेशनचे अध्यक्ष 'विकास कुंभारे' यांचे अपघाती निधन. Vikas Kumbhare President of 'Kolam Vikas Foundation' passed away In road accident.

गडचांदूर:-@korpanalivenews...
  कोलाम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारे कोलाम विकास फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष 'विकास कुंभारे' हे एका भीषण अपघातात गंभीर जखमी झाले होते.त्यांना चंद्रपूर येथील एका खाजगी दवाखान्यात भर्ती करण्यात आले.मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.ते कोलाम बांधवांचे काम आटोपून गडचांददूर वरून राजूराकडे परतत असतांना चांदनवाही जवळ त्यांचा अपघात झाला.'Vikas Kumbhare' President of Kolam Vikas Foundation passed away in road accident.विकास कुंभारे हे वेकोलीच्या सास्ती खुल्या कोळसा खाणीत फोरमन पदावर कार्यरत आहे.त्यांनी काही काळ एका वृत्तपत्रात प्रतिनिधी म्हणूनही काम केले.अपघातानंतर त्यांना राजूरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले तिथून त्वरित चंद्रपूरला हलवण्यात आले होते.डाॅक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले परंतू उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.
                           -------#-------
        "दुर्लक्षित कोलामांचा पाठीराखा हरवला"
                मनाला चटका लावणारी बातमी.                                       'ॲड.दीपक चटप'
चंद्रपुर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात वास्तव्य असलेल्या कोलाम समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे 'विकास कुंभारे' यांचे 29 जानेवारी रोजी अपघाती निधन झाले.कोलाम सहाय्यता अभियानाच्या माध्यमातून कोरोना काळात आम्ही लोकसहभागातून 1400 कुटुंबांना डोंगर कपारित जाऊन रेशन किट्स वितरीत केल्या होत्या. साधारण 2 ते 3 वर्षाआधी जिवती तालुक्यातील 'घोडणकप्पी' या गुड्याला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा ध्वजारोहन केले,त्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहचविले. लंडनला येण्यापूर्वी त्यांनी कोलाम विकास फाउंडेशनच्या माध्यमातून माझा सत्कार ठेवला होता. "तू आमच्या परिवारातील भाग" असल्याचे ते नेहमी म्हणायचे.आमचे नियमित बोलणे असायचे.3,4 दिवसापुर्वीच आमचे बोलणे झाले.खडकी रायपुर येथे कोलाम विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सूरू केले. कोलामांच्या प्रश्नांसाठी कार्यक्रम घेतले.अशाप्रकारे जुन्या आठवणींना उजाळा देत 'कृतीयुक्त पाऊल टाकत बदल घडवू पाहणारा सजग सामाजिक कार्यकर्ता हरविला' अशी खंत व्यक्त करत ॲड.दीपक चटप यांनी लंडनहून त्यांना आदरांजली वाहिली आहे.
'Vikas Kumbhare' President of Kolam Vikas Foundation passed away accidentally...
'Neglected Kolams Lose Support' Adv.Deepak Chatap...
                           -------//-------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या