गडचांदूर:-@Uddanpul...
राजूरा ते गोविंदपूर,या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला युद्धपातळीवर सुरूवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.महामार्गाला अडथळा ठरलेले वृक्ष कटाई, लहानमोठे अतिक्रमण काढले जात आहे.या महामार्गावर विराजमान गडचांदूर शहरात उड्डाणपूल Uddanpul उभारण्यात येणार असल्याचे कळते.असे असताना मात्र उड्डाणपूला विषयी येथील व्यापाऱ्यांमध्ये कमालीचा रोष पहायला मिळत आहे. उड्डणपूलाची निर्मिती झालीच तर व्यापार ठप्प होतील, या भीतीपोटी व्यापारी वर्ग दिवस काढत असल्याचे चित्र असून शासनाने हा उड्डाणपूल रद्द करावा Flyover should be cancelled अन्यथा उपोषण, मुंडन आंदोलन करण्याचा इशारा काही व्यापाऱ्यांनी दिला आहे.
औद्योगिक शहराच्या नावाने प्रसिद्ध गडचांदूर शहरात मोठी बाजारपेठ असल्याने मोठा व्यापारी वर्ग याठिकाणी आहे.उड्डणपूल बनल्याने लहानमोठे व्यापार ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक संकट financial crisis कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.अगोदरच मागील दोन वर्ष कोरोनामुळे Corona व्यापार रसातळाला गेला,आता कशीबशी गाडी रुळावर येत असतानाच उड्डाणपूल उभारले जात आहे.व्यापाऱ्यांनी मरावे की जगावे हेच समजणे कठीण झाले असून बेरोजगारीला चालना मिळणार हे मात्र नक्की अशी प्रतिक्रिया उमटत आहे. उड्डाणपूल व्यापाऱ्यांच्या जीवावर उठला असून पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार The problem of food and water will arise असल्याचे बोलले जात आहे.शासनाने हा पूल रद्द करावा अन्यथा आंदोलन movement उभारण्याचा इशारा काही त्रस्त व्यापाऱ्यांनी दिला आहे.आता मायबाप सरकार Maibap Govt या व्यापाऱ्यांची व्यथा जाणून येथील उड्डाणपूलाचा निर्णय बदलणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
"Uddanpul" will be in Gadchandur city? Fear of trade "stopping"?
--------//--------
0 टिप्पण्या