Subscribe Us

header ads

'भाजप' शिंदे गटाला धुणीभांडी करायला ठेवणार का ? Will the BJP keep the Shinde group to wash the dishes?

मुंबई:-@Sanjay Raut...
     भाजपने ‘मिशन 145’ सुरू केला आहे.भाजपच्या या "मिशन 145’' चा रणशिंग फुंकण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा JP Nadda हे सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे.त्यामुळे जे.पी.नड्डा यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजपच्या या मिशनची राज्यात जोरदार चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे फायरब्रॅड नेते "संजय राऊत" यांनी मात्र या मिशनची खिल्ली उडवली आहे. भाजप जर ‘'मिशन 145" सुरू करत आहे.तर "शिंदे" गटाला काय धुणीभांडी करायला ठेवणार आहे का ? असा सवाल संजय राऊतांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.Will the BJP keep the Shinde group to wash the dishes?
      भाजपचे जर ‘'मिशन 145’' असेल तर त्यात शिंदे गट कुठे आहे ? भाजपचे ‘'मिशन 145’' असेल तर शिंदे गटाच्या लोकांना धुणीभांडी करायला ठेवणार का ? याचा अर्थ भाजपच्या पायरीवरही यांना कोणी उभं करत नाही.ही तात्पुरती तडजोड आहे,अशी टीका संजय राऊत यांनी केली.विरोधी पक्षनेते अजीत पवार यांनी संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणत ते धर्मवीर नव्हते असं विधान केलं आहे.त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहे.यावर बोलण्यास संजय राऊत यांनी नकार दिला.याबाबत मला अभ्यास करावा लागेल,असं राऊत म्हणाले.मात्र,उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने औरंगाबादचा संभाजी नगर नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता.या सरकारमध्ये त्या प्रस्ताचं काय झालं ? असा सवाल राऊत यांनी केला.
      महाराष्ट्राच्या विधानसभेत विकासावर,योजनांवर बोलण्याची संधी मिळत असते.मुख्यमंत्री जर सभागृहात उखाळ्यापाखाळ्या काढायला लागले तर राज्याच्या विकासावर कोणी बोलायचा ? त्यांचा भाषण ऐका...हे गल्लीतला भाषण आहे. उखाळ्यापाखाळ्या काढण्या,त्यांना एक संधी मिळाली आहे.भले ती बेकायदेशीर मिळाळी असेल.पण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून संयमाने बोलायला हवा,असा चिमटा त्यांनी काढला.विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून बोलत आहात.कोणी मंत्री म्हणून बोलत असतो,तर कोणी विरोधी पक्षनेता म्हणून बोलत असेल तर त्यांनी कायद्याचा भान ठेवून बोलले पाहिजे. लोकांच्या समस्यांवर बोलले पाहिजे,असेही ते म्हणाले.
Will the BJP keep the Shinde group to wash the dishes ?
                         ---------//--------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या