News@Politics...
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले.अनेक घडामोडीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांना भाजपासोबत सत्ता स्थापन करून जवळपास 8 महिन्यांचा कालावधी लोटत आहे.हे सरकार अल्पावधीतच कोसळेल असा दावा आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला होता.मात्र,राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मजबूत असल्याचे चित्र आतापर्यंत दिसले आहे.अशी एकंदरीत राजकीय परिस्थिती असताना आगामी निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपा युतीकडून मुख्यमंत्री पदाचा प्रमुख चेहरा कोण ? याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहे.2024 मध्येही तुम्हीच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार का ? Will you be the Chief Minister in 2024.असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट उत्तर देणे टाळले.
“हे पहा...,हे सर्व जनतेच्या हातात असतं,कुणाला मुख्यमंत्री करायचं आणि कुणाला मुख्यमंत्री पदावरून हटवायचं,याचा निर्णय जनताच घेत असते,आम्ही काम करणार आहोत,आम्हाला दिवस-रात्र एक करून काम करायचं आहे,आज आम्ही राज्यात मोठमोठे प्रकल्प उभारत आहोत, आम्ही आरोग्य,शिक्षण,पर्यावरण,शेती आणि पायाभूत सुविधा,अशा सर्वच क्षेत्रात काम करत आहो,आम्ही प्रत्येक क्षेत्राचा विकास करू इच्छित आहो,महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचा राज्य आहे,महाराष्ट्राचा जीडीपी GDP 15 टक्के आहे,महाराष्ट्राची निर्यात 25 टक्के इतकी आहे, थेट परकीय गुंतवणूक 17 ते 20 टक्के आहे, देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा खूप मोठा योगदान आहे,त्यामुळे आम्ही काम करणारे आहो,” असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिला आणि विचारलेल्या प्रश्नावर थेट उत्तर देणे टाळले.
Will you be the Chief Minister in 2024...?

-----------//----------
0 टिप्पण्या