Subscribe Us

header ads

शेतकऱ्यांना सल्ला देताना अजित पवार यांची घसरली जीभ, Ajit Pawar’s slip of the tongue while giving advice to farmers.

@Ajit Pawar...
           कोणत्या कारणावरून राजकीय मंडळी नेहमीच चर्चेत असतात.विरोधी पक्ष नेत्यांकडून सत्ताधारी पक्षावर होणारे आरोप प्रत्यारोप हे तर सुरूच असतात.त्याचबरोबर अनेकदा नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना Agriculture या नेत्यांकडून फोकटचे सल्ले दिले जातात.परंतू काहीवेळा नेते चुकून का होईना,पण असे काही बोलून जातात, ज्यामुळे भलताच गदारोळ निर्माण होतो. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते अजित पवार Ajit Pawar, नेहमीच नागरिक आणि शेतकऱ्यांना विवीध सल्ले देत असतात.शेतकऱ्यांनी शेतीतून भरघोस पिक,उत्पादन काढावे यासाठी अजित पवार नेहमीच प्रयत्नशील असतात परंतू शेतकऱ्यांना सल्ला देतानाच आता दादांची Ajit Pawar जीभ घसरली आहे.Ajit pawar statement on farmers.
               "पवारांची घसरली जीभ"
      खरं तर,अजित पवार यांची घसरण्याची ही पहिलीच वेळ नाही.यापूर्वी देखील दादांची अनेक वेळा जीभ घसरली आहे.परंतु यावेळी शेतकऱ्यांना सल्ला देताना त्यांनी एक असं विधान केलं आहे ज्यामुळे एक वेगळीच चर्चा रंगली आहे.इतकचं नाही,तर या विधानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शेतकऱ्यांना सल्ला देताना दादांनी नागरिकांना देखील लोकसंख्ये बाबत एक मोलाचा सल्ला दिला आहे.जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावमध्ये ग्लोबल कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय,याच कार्यक्रमात ते बोलत होते.
               "काय म्हणाले दादा ?"
       अजित पवार म्हणाले की,“बाकीची प्रदर्शन राजकीय असतात,त्यांना पद,सत्ता मिळाली म्हणून तेही म्हणतात माझ्या मतदारसंघात प्रदर्शन घे.एक रेडा आणून बांधतात आणि म्हणतात इतक्या कोटींचा रेडा आहे.त्याला काय करायचं, इतक्या कोटींचा रेडा ? रेडा बघून दूध वाढणार आहे का ? तर रेडा…” असा विधान भर सभेत त्यांनी केला आहे.यामुळे सर्वत्र हीच चर्चा रंगली आहे.
            "नारिकांनाही दिला सल्ला"
      त्याचबरोबर दादांनी नागरिकांना देखील एक सल्ला दिला आहे.सध्या संख्येचा वाढता आकडा पाहता त्यांनी नागरिकांना याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.त्याचवेळी ते म्हणाले की, आपली लोकसंख्या भरमसाठ वाढत आहे. 1947 ला 35 कोटी लोकसंख्या होती,आता सव्वाशे कोटी पार केली आहे.2021 ला जनगणना झालीच नाही,आता झाली की आकडा काय निघेल माहीत नाही.त्यानंतर कोरोना आला. कोरोनामध्ये दुसरे कामच नव्हते,म्हणजे शेतीची कामे होती,परंतू लॉकडाऊन होता आणि लोकं मोकळी बसली होती.हसण्यावारी नेऊ नका लोकसंख्या कमी करा” असा सल्ला देत त्यांनी नागरिकांना टोला देखील लगावला आहे.
Ajit Pawar’s slip of the tongue while giving advice to farmers, ‘If milk does not increase by looking at reda...
                        --------//--------
                        
                   मुख्यसंपादक
                सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या