Subscribe Us

header ads

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील लोडर भरती प्रक्रियेत मोठा घोळ.A big mess in the loader recruitment process in Ultratech Cement Company.

गडचांदूर:-@Ultratech Cement....
            सिमेंट उत्पादनात अग्रगण्य असलेल्या कोरपना तालुक्यातील 'अल्ट्राटेक सिमेंट वर्क्स' Ultratech Cement Company आवारपूर,येथे घेण्यात आलेल्या लोडर भरती मध्ये मोठ्याप्रमाणात घोळ झाल्याची ओरड सुरू असून या भरती प्रक्रियेत कोणतीही पारदर्शकता न ठेवता लोडरची निवड करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे..A big mess in the loader recruitment process in Ultratech Cement Company.सदर भरतीच्या निकषांविषयी युवकांमध्ये कमालीचा संभ्रम आहे.अनेक कामगारांची सेवा जेष्ठता,पोलीस पडताळणी न बघता कामगार संघटनेचे पदाधिकारी,आजीमाजी सरपंच,यांच्या घरचे व्यक्ती तसेच अल्ट्राटेक कंपनीतील कंत्राटदारांच्या घरचे व्यक्ती व नातेवाईक,अशा कामगारांची निवड करण्यात आल्याचे कळते.
           ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा लोकांची निवड करण्यात आली असून जे कामगार मयत झाले,किंवा आर्थिक परिस्थिती खालावली,अशा कामगारांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.आर्थिक स्थिती बरोबर नसल्याने अनेक कामगार आर्थिक व्यवहार करू शकले नाही,त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याचे ते बोलत आहे.यासंदर्भात युवकांमध्ये प्रचंड रोष असून 10 वर्षापासून ठेकेदारीत काम करणाऱ्या कामगारांना डावलून 1 ते 3 वर्षे काम करणाऱ्या ठेकेदारीतील कामगारांची निवड करण्यात आल्याचे कळते.लोडर भरती प्रक्रिया पारदर्शक न करता दलालांमार्फत अनेक कामगारांकडून 3 ते 5 लाख रूपये घेतल्याचे आरोप होत आहॆ. याप्रकरणी युनियनच्या एका पदाधिकाऱ्यांवरच आरोप होत असल्याने आता बिचाऱ्या कामगारांना न्याय कोण देणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
      "लोडिंग कर्मचाऱ्यामार्फत स्वीकारले पैसे ?"
बिबी येथील लोडिंगमध्ये कार्यरत एका व्यक्तीचे पॅकिंग प्लांटच्या अधिकारी व एका काममगार संघटनेच्या एका पदाधिकाऱ्या सोबत चांगले संबंध आहे. "आम्ही अनेकांना नोकऱ्या लावून दिल्या आहे,माझ्या मुलालाही लोडींग मध्ये नोकरी लावली,पैसे दिल्याशिवाय काम होत नाही,असे मला सांगितले.मी व माझ्या मित्राने त्या व्यक्तीला पैसे दिले आहे,काही पैसे नगदी दिले तर काही 'फोन पे' च्या माध्यमातून दिल्याचे पुरावे आहेत" अशी माहिती एका निवृत्त लोडर कामगाराच्या मुलाने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले आहे.
"पैसे देऊ न शकल्याने माझ्या मुलाला नोकरी दिली नाही"
माझे पती लोडिंगमध्ये काम करीत होते.त्यांच्या निधनानंतर परिवाराचे पालनपोषण करणे कठीण झाले आहे.अधिकारी लोकांच्या जवळीक असलेल्या एकाच परिवारातील दोघांना लोडर म्हणून कामावर घेतले.त्याच व्यक्तीच्या पत्नीच्या भावालाही लोडर म्हणून कामावर घेतले,हा अन्याय असून कंपनीचे अधिकारी व युनियनचे पदाधिकारी काहीही ऐकायला तयार नाही.आम्ही पैसे देऊ शकत नसल्याने माझ्या मुलाला नोकरीत घेतले नाही.असे शोभा मलारपू,या मयत कामगाराच्या पत्नीचे म्हणणे आहे.
"भरती रद्द न केल्यास आमरण उपोषण करणार"
पॅकिंग प्लांटच्या काही अधिकारी व युनियनच्या एका  पदाधिकाऱ्यांच्या मनमर्जीने लोडर भरती करण्यात आली,यामध्ये अनेक कामगाराकडून पैसे वसुलण्यात आले,यामुळे पात्र कामगारावर अन्याय झाला,भरती रद्द न केल्यास लवकरच आमरण उपोषणाला बसणार,या भरती प्रक्रियेविरूद्ध कामगार वर्ग मोठे आंदोलन करणार असल्याची माहिती आवारपूर ग्रामपंचायतच्या माजी सदस्या शीला गौतम धोटे यांनी दिली आहे. तर सदर भरती नियमानुसार असून तक्रारी संदर्भात चौकशी करून निर्णय घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया गौतम शर्मा उपाध्यक्ष,एच.आर. अल्ट्राटेक आवारपूर यांनी दिल्याचे कळते.आता याप्रकरणी पढे काय घडते याकडेसर्वांचे लक्ष लागले आहे.
A big mess in the loader recruitment process in Ultratech Cement Company...
                    ---------//--------
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या