Subscribe Us

header ads

संत सेवालाल महाराज जयंती साजरी.Saint Sewalal Maharaj Jayanti Celebration.

गडचांदूर:-@Korpanalive News... 
       सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचलित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे ''संत सेवालाल महाराज'' यांच्या 284 व्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सोहळ्याला सुरूवात करण्यात आली.संत सेवालाल महाराज यांचे कार्य तळागाळातील माणसांसाठी कसे प्रेरणादायी होते.याची माहिती देत,संत सेवालाल महाराजांनी केलेल्या प्रबोधनामुळेच गोर बंजारा समाजातील व बंजारा समाजातील लोकांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळाली,असे विचार मुख्याध्यापक काळे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना मांडले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यालयाचे शिक्षक जीवन आडे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत समाज प्रबोधनाचे कार्य करताना सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून समाज संघटीत करून समाजाची प्रगती साधावी,असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सेवा जेष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे,आभार बोबडे सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी शिक्षिका तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Saint Sewalal Maharaj Jayanti Celebration.
               --------//-------
                   
                  मुख्यसंपादक
                सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या