Subscribe Us

header ads

राऊतांच्या त्या आरोपावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

@korpanalive News...
       खासदार संजय राऊत यांनी जे आरोप केले, त्यांची चौकशी केली जाईल.तसेच ही स्टंटबाजी Stunt आहे का ? हे देखील तपासले जाणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.CM Eknath Shinde on Sanjay Raut Allegation.मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र "खासदार श्रीकांत शिंदे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली आहे" असा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता.MP Sanjay Raut made a sensational allegation that "Khasdar Srikant Shinde has ordered my murder.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.राऊतांनी जे आरोप केले त्याची चौकशी करत,ही स्टंटबाजी आहे का ? हे ही तपासले जाईल,असे मुख्यमंत्री म्हणाले.राज्य सरकार सर्वांच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहे.त्यांच्या सुरक्षेबाबत पोलिसांची समिती निर्णय घेईल, सुरक्षेचा आढावा घेऊन निर्णय घेतले जातात, राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून कोणाच्याही सुरक्षेत कपात केली जाणार नाही,कोण विरोधी पक्षात आहे,याचा विचार न करता,गरज असल्यास सुरक्षाही पुरवली जाईल, कोण कुठल्या पक्षाचा आहे,विरोधी पक्षाचा आहे का? हे पाहून आम्ही कोणाच्याही सुरक्षेत कपात करणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
              "राजा ठाकूरच्या पत्नीची तक्रार"
    दरम्यान,ठाण्यातील गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्याच्या संजय राऊतांच्या आरोपावर राजा ठाकूरच्या पत्नीने संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे.राजा ठाकूरला गुंड संबोधल्याने पत्नी पूजा ठाकूर यांनी कपूर बावडी पोलीस ठाण्यात राऊतांविरोधात तक्रार दिली आहे.माझ्या पतीला गुंड बोलणारे संजय राऊत कोण आहे ? त्यांच्याकडे काय पुरावा आहे ? असा सवालही त्यांनी केला आहे.
MP Sanjay Raut made a sensational allegation that "Khasdar Srikant Shinde has ordered my murder...
                   --------//-------
                
                मुख्यसंपादक
              सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या