Subscribe Us

header ads

विदर्भ निर्माण यात्रा गडचांदूरात दाखल.

गडचांदूर:-News@Vidarbha State...   
            विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने 21 फेब्रुवारी पासून "विदर्भ निर्माण यत्रा" Vidarbha Nirman Yatra सुरू करण्यात आली आहे.ही यात्रा 24 फेब्रुवारी रोजी गडचांदूर शहरात दाखल झाली.गडचांदूर जवळील थुटरा बसस्थानका पासून भव्य बाईक रॅली काढण्यात आली.गडचांदूर शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत सदर रॅली गांधी चौक येथे सभा स्थळी पोहोचली.मोठ्यासंख्येने विदर्भवादी सहभागी झाले होते. "वेगळा विदर्भ झालाच पाहिजे,विदर्भ आमचा हक्काचा,नाही कुणाच्या बापचा" अशा गगनभेदी घोषणा रॅली दरम्यान देण्यात आल्या. गडचांदूर येथे यात्रा पोहचताच यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.यावेळी मंचावर पुर्व विभाग अध्यक्ष अरूण केदार,माजी जि.प. सभापती निलकंठराव कोरांगे,कोअर कमिटी सदस्य तात्या साहेब मत्ते,माजी सभापती तथा कोअर कमिटी सदस्या सौ.सुधाताई पावडे,युवा आघाडी अध्यक्ष भूवेश मासीरकर,शेषराव बोंडे, कपील इदे इतरांची उपस्थिती होती.यावेळी आयोजित जाहीर सभेत मान्यवरांनी  "वेगळा विदर्भ का ?"  या विषयी सखोल मार्गदर्शन केले. "Vidarbha Nirman Yatras''entered Gadchandur city...
       विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन गेल्या 110 वर्षापासून संघर्ष सुरू आहे.Vidarabha State मात्र धोकेबाज नेत्यांनी याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले.विदर्भात मोठ्याप्रमाणात खनिज संपत्ती आहे,यामध्ये औष्णिक विज निर्मितीसाठी लागणारे दगडी कोळसा, सिमेंटसाठी लागणारी चुनखडी दगड,यासोबतच मोठ्याप्रमाणात असणारे तलाव,हे सर्व उपलब्ध असताना त्याचा वापर विदर्भासाठी न होता पश्चिम महाराष्ट्र, मुंबईत केल्या जात आहे.समृद्ध विदर्भात बेरोजगारी वाढलेली आहे.माजी मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांनी वेगळ्या विदर्भ मागणीसाठी धोका दिला व अखंड महाराष्ट्राचा नारा दिला.दुर्लक्षित विदर्भाला न्याय मिळु शकला नाही.त्यामुळे विदर्भ राज्याची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन माजी ग्रामपंचायत सदस्य तथा शेतकरी संघटना शहर सचिव संतोष पटकोटवार तर आभार नांदा ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर चटप यांनी व्यक्त केले.ही यात्रा चंद्रपूर जिल्ह्यातील विवीध तालुके व शहरांमध्ये प्रवास करत 5 मार्च रोजी नागपूर येथे पोहचणार आहे.विदर्भ समर्थकांनी नागपूर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
''Vidarbha Nirman Yatra'' entered Gadchandur city...

                      ----------//----------
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या