Subscribe Us

header ads

मराठी राजभाषा गौरव दिन साजरा.

गडचांदूर:-@Korpanalive News..
       "लाभले आम्हास भाग्य,बोलतो मराठी" मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी,ज्ञानपीठ पुरस्कार विजेते "विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज" Vishnu Vaman Shirwadkar (Kusumagraj)जयंती दिन 27 फेब्रुवारी रोजी सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे "मराठी राजभाषा गौरव दिन" साजरा करण्यात आला.Marathi Language Gaurav Deen Celebrated.
            सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक धर्मराज काळे होते.आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून मुख्याध्यापक काळे यांनी मराठी भाषेचे संगोपन,इतिहास व महत्त्व,याविषयी अभ्यासपूर्ण माहिती सांगितली.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित प्राध्यापक अनिल मेहरकूरे यांनीही मराठी भाषेचे महत्त्व विषद केले. प्रास्ताविक तथा संचालन सेवाजेष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांनी केले.याप्रसंगी सुरेश पाटील बावनकर सर,मांढरे सर,जी.एन.बोबडे सर, ज्योती चटप,श्रीमती सुषमा शेंडे,माधुरी उमरे,प्रा. सोज्वल ताकसांडे,प्रा.गुजर,प्रा.पोडे,प्रा. मुप्पिडवार,प्रा.सैय्यद जहीर,प्रा.सातारकर, भालचंद्र कोगरे सर,मेश्राम सर,मरसकोल्हे सर, यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
Vishnu Vaman Shirwadkar Jayanti... 
Marathi Language Gaurav Deen Celebrated...

                      --------//-------
                    
                   मुख्यसंपादक
                 सै.मूम्ताज़ अली.
 मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या