Subscribe Us

header ads

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान.Like 'Congress', 'BJP' is becoming a party of leaders..!

News@BJP... 
          काँग्रेस प्रमाणेच नागपूर भाजपही नेत्यांचा पक्ष होतोय,पक्ष आहे म्हणून आपण आहो,हे कायम लक्षात असू द्या,अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister 'Devendra Fadnavis.यांनी भाजपाच्या शहर पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यकारिणीची बैठक 17 फेब्रुवारी रोजी नंदनवन येथील बोगन व्हीला येथे पार पडली.याप्रसंगी शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके,आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार सुधाकर देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.येत्या काळात निवडणूकीच्या कामांना लागायचे आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर, आता नागपूर भाजप जोमाने आगामी निवडणूकीच्या तयारीला लागली आहे.यात महानगरपालिका निवडणूक,त्यानंतर येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीचा समावेश आहे.याच पार्श्वभुमीवर नागपूर शहर भाजपच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कार्यकारणी बैठकीचे उद्घाटन केला,तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समारोपीय कार्यक्रमात भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.बैठकीत भाजपचे संघटन मजबूत करणे,केंद्र आणि राज्य सरकारने केलेली कामे मतदारांपर्यंत पोहोचवणे,मतदारांशी संपर्क वाढवणे,यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
            "150 जागांवर विजयाचा निश्चय"
2024 च्या विधानसभा निवडणूकीत राज्यात भाजपच्या स्वतःच्या 150 जागा निवडूण आणायच्या आहे,बाळासाहेबांची शिवसेना सोबत असल्याने पूर्वीपेक्षा अधिक जागा निवडून येतील. पण,आपल्या 150 जागा निवडून आणायच्या आहे.आपल्याला 20-20च्या मॅचसारखे काम करायचे आहे.येत्या काळात पाच वर्षांची निवडणूकीची कामे करायची आहे,असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
            "पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग"
कार्यकारिणीच्या बैठकीत शहरातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.त्यात महिला पदाधिकाऱ्यांची संख्या देखील लक्षवेधी ठरली. आगामी महापालिका,लोकसभा व विधानसभेची तयारी एकत्रच केली जाणार असल्याचा सूर पदाधिकाऱ्यांमधून उमटला.भाजप कार्यकर्त्यांची शिस्त या बैठकीतही दिसून आली.
Like 'Congress', 'BJP' is becoming a party of leaders..!                  ---------//--------
                      
                   मुख्यसंपादक
                सै.मूम्ताज़ अली.
  मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या