Subscribe Us

header ads

समाजाला विज्ञानासोबतच अध्यात्माची गरज.

गडचांदूर:-@MP Balu Dhanorkar...
      विज्ञानाने प्रगती होते,मात्र अध्यात्माने संस्कार रुजते.त्यामुळे विज्ञानासोबतच समाजाला अध्यात्माची सुद्धा तेवढीच गरज असल्याचे मत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी व्यक्त केले.ते कोरपना येथील वडगाव येथील महाशिवरात्री व भजन संमेलना Maha Shivratri and Bhajan Meeting निमित्य आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.संमेलनाचे उद्घाटन स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच आशिष देरकर यांच्या हस्ते पार पडले.
        ग्रामगीताचार्य विठ्ठल डाखरे महाराज यांच्या संकल्पनेतून वडगाव येथे "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा" Rashtrasant Tukdoji Maharaj and Sant Gadge Baba यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक उपक्रम राबविले जातात.हभप डाखरे महाराज यांच्या या सामाजिक कार्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन खा.बाळूभाऊ धानोरकर यांनी दिले.     
             सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरपंच स्मिता किन्नाके,उपसरपंच सुदर्शन डवरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीराम भोंगळे,कैलाश मेश्राम,खिर्डी ग्रामपंचायत उपसरपंच दीपक खेकारे,अभय मुनोत,अशोक आस्कर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.दोन दिवसीय भजन संमेलनात जिल्ह्यातील जवळपास 30 भजन मंडळींनी सहभाग नोंदवला.उद्घाटन,प्रास्ताविक तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीराम भोंगळे तर संचालन व आभार रामचंद्र काकडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला परिसरातील शेकडो नागरिकांनी हजेरी लावली होती.
Society needs spirituality along with science...
MP Balu Dhanorkar...
                        --------//-------
                     
                 मुख्यसंपादक
              सै.मूम्ताज़ अली.
 मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या