Subscribe Us

header ads

कधी मिळणार प्रदूषणापासून मुक्ती.?

गडचांदूर:-News@The problem is pollution...
        चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना येथील गडचांदूर शहर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रदुषणाच्या विळख्यात सापडले आहे.तालुक्यात 4 अंतरराष्ट्रीय दर्जाचे सिमेंट उद्योग आहे.याच श्रेणीत गडचांदूर शहराच्या मधोमध माणिकगड सिमेंट कंपनी मोठ्या डौलाने उभी आहे.ज्यावेळी हा उद्योग शहरात आला,त्यावेळी येथील भोळ्याभाबड्या शहरवासीयांना वाटले की,मुलांना नोकऱ्या लागतील,शहराचा भरभरून विकास होईल.मात्र हे सारे "बोलाची कढी आणि बोलाचाच भात" अशी अवस्था झाली असून नागरिकांनी बघितलेल्या सपनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.या उद्योगामुळे शहरवासीयांना दुसरे काही नाही पण प्रदुषणाची भेट बेदरकारपणे मिळत आहे.माणिकगड कंपनीच्या कणीयुक्त वायू प्रदूषणामुळे शहरातील कित्येक नागरिकांना श्वासाचे आजार झाले आणि सतत होत आहे. कित्येक आंदोलने झाली,कित्येकदा जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे Pollution Control Board निवेदने देण्यात आली मात्र संबंधीत विभाग कारवाई करायला तयारच नाही.! प्रत्येकवेळी निव्वळ आश्वासनाचे डोस पाजले जात असून प्रदूषणाच्या विषयावर "खाल पासून वरपर्यंत सर्व काही ओक्के" Everything is OK from bottom to top.असल्याचे आरोप होत आहे.कंपनीच्या विरोधात मागील काळात बरीच आंदोलने झाली.याच श्रेणीत काही महिन्यापूर्वी मोठ्या तावातावाने पुन्हा आंदोलन उभे करण्यात आले. "प्रदुषण नियंत्रण कृती समिती" Movement Against Pollution तयार करण्यात आली.प्रदूषणा संदर्भात सोशल मिडीयावर मोठमोठ्या योजना आखण्यात आल्या.हस्ताक्षर मोहीम,पत्रव्यवहार अशा गोष्टी वगळता पुढे मात्र समाधानकारक काहीच घडले नाही.हळूहळू यालाही पूर्णविराम मिळाला आणि कृती समितीचे आंदोलन अचानकपणे अदृश्य झाले.? परिणामी आजही प्रदूषण जैसे थे असून "त्या प्रदूषण कृती समितीचा शोध लागेना" अशी उपहासात्मक चर्चा शहरात ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.याविषयी उलटसुलट चर्चांना कमालीचे उधाण आले असून "आम्ही कधी होणार प्रदूषणापासून मुक्त" When will we be pollution free अशी विचारणा आता केली जात आहे.कंपनीच्या डस्टमुळे दिवसेंदिवस निष्पाप नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असताना संबंधित विभागा पाठोपाठ लोकप्रतिनिधींनी सुध्दा जनतेच्या या जीवघेण्या समस्येकडे डोळेझाक केल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.इतके आंदोलन झाले, आता आंदोलनाचा विचार केला तरी अंगावर शहारे येतात अशी जळजळीत भावना व्यक्त होत आहे.गडचांदूरकरांची या नरकयातनेतून कधीही सुटका होणार नाही ? असे म्हटले तर वावगे ठरणार आहे.
When will citizens be free from pollution 
                        --------//--------
                  
                  मुख्यसंपादक
                सै.मूम्ताज़ अली.
 मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या