Subscribe Us

header ads

दोषी अधिकार्‍यांवर दंडात्मक कारवाई आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाका,

गडचांदूर:-@Korpanalive News...
         कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 चे काँक्रिट रोड, पेवर ब्लॉक व इतर प्रभागातील काँक्रिट रोड,नाली इत्यादी कामांचा निकृष्ठ दर्जा,तसेच दलित वस्ती योजनेंतर्गत नवीन नळ योजना hdpe पाईप लाईन,या कामांची चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदार यांना काळ्या यादीत समाविष्ट करून दंडनीय कार्यवाही करण्याची मागणी येथील पर्यावरण संरक्षण विषयक संस्था अध्यक्ष विजय ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.Take action against the guilty officers and blacklist the contractor,Vijay Thackeray's demand to the District Officers...
         सदर प्रकरणी सविस्तर असे की,गडचांदूर नगरपरिषद हद्दीत गेल्या 3 वर्षात अनेक विकासकामे करण्यात आली.परंतू मुख्याधिकारी, बांधकाम विभाग अधिकारी आणि ठेकेदारांनी मिळून सुनियोजित कटकारस्थान रचून भ्रष्टाचार केला आणि निकृष्ट कामे करून विकास कामात लूट केली.गुणवत्ता इतकी निकृष्ट केल्या गेली की, प्रभाग क्रमांक 2 येथील बंडू ठाकरे यांच्या घरापासून तर नगर परिषद सदस्या सौ.जयश्री ताकसांडे यांच्या घरा पर्यंत 20 वर्षे टिकून राहणारे रोडचे मधोमद रोडचे चक्क 2 तूकड़े पडले,पेवर ब्लॉक तर लावलेच नाही.याची चौकशी व कार्यवाही होणे अपेक्षित असल्याची बाब ठाकरे यांनी पत्रात नमूद केली आहे.
          याच श्रेणीत दूसरा प्रकार असा की,विपिन मोरे नामक ठेकेदाराने प्रभाग क्रमांक 2,4 व 7 मध्ये दलित वस्ती सुधार योजनेतून 1 कोटी 15 लाख रूपयांचे नवीन नळ योजनेसाठी HDPE पाइप लाईन टाकने व नळ पाइप लाईनसाठी काँक्रिट रोड व पेवर ब्लॉकची तुटफुट झाल्यास ती पूर्वत दुरूस्ती करण्याचे काम देण्यात आले पण याही कामात भ्रष्टाचार झाला.पाइप लाईनसाठी काँक्रिट रोड व पेवर ब्लॉक Concrete road and paver block तोडण्यात आले,पण पूर्ववत दुरूस्ती करण्यात आली नाही,परिणामी परीक्षणा आधीच पाईप लाईन लीकेज झाली.तसेच यापूर्वी जैसवाल कंपनीद्वारे संपूर्ण शहरात नवीन फिल्टर प्लाँटसह नळ योजना राबविण्यात आली आणि त्यावर 9 कोटी रूपये खर्च झाले,तेही पाण्यात बुडाले व दुर्दैवाने ती योजना ही भ्रष्टाचाराची भेट चढली.असे आरोप करत सदर प्रकरणी सखोल चौकशी करावी व दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारा विरुद्ध कडक कार्यवाही करावी,अशी तक्रार वजा मागणी विजय ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.विशेष म्हणजे यासंदर्भातील तक्रार ठाकरे यांनी 28 डिसेंबर 2022 तसेच 18 जानेवारी 2023,अशाप्रकारे दोनदा गडचांदूर नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे अधिकृत ईमेलद्वारे केली होती.मात्र काहीच सकारात्मक न घडल्याने मोठ्या आशेने आता जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली,अशी माहिती ठाकरे यांनी  "कोरपना Live" ला दिली असून आता या प्रकरणी पुढे काय घडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Take action against the guilty officers and blacklist the contractor, Vijay Thackeray's demand to the District Officers...
                    ----------//---------
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या