Subscribe Us

header ads

छत्रपती शिवाजी महाराज जयंती.Chhatrapati Shivaji Maharaj

गडचांदूर:-@Korpanalive News...
   सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित  "सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय" गडचांदूर येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक "छत्रपती शिवाजी महाराज" Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या जयंतीचा सोहळा आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य धर्मराज काळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.प्रशांत खैरे प्रा.मेहरकुरे,पर्यवेक्षक संजय गाडगे, सेवा जेष्ठ शिक्षिका ज्योती चटप यांची उपस्थिती होती.Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti.
"शिवरायांचा खरा इतिहास बहुजन समाजापर्यंत पोहोचला नाही,तो समजून घेऊन,वाचून सर्वांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शिक्षक वृंदांनी घ्यावी व शिवाजी महाराजांची जयंती सणाप्रमाणे घराघरात साजरी व्हावी" असे विचार शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन करताना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.शिवाजी महाराजांनी सर्व मावळ्यांना एकत्र करून जे स्वराज्य निर्माण केले ते टिकवण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी व सर्वधर्मसमभावाची शिकवण समाजात रुजविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी.हेच खरे शिवाजी महाराजांना व त्यांच्या विचारांना अभिवादन ठरेल,असे मनोगत मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी व्यक्त केले. Shivaji Maharaj's birth anniversary should be celebrated at home like a festival.
         प्रास्ताविक तथा आभार सेवा जेष्ठ शिक्षक महेंद्र कुमार ताकसांडे यांनी केले. कार्यक्रमा दरम्यान "गर्जा महाराष्ट्र माझा" भावपूर्ण आवाजात हे गीत कु.उंमरे मॅडम,श्रीमती शेंडे मॅडम,गोपमवार मॅडम कु.ताकसांडे मॅडम यांनी गायले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.झाडे,प्रा.सैय्यद जहीर,प्रा.सातारकर,प्रा.गुजर,प्रा.मेहरकुरे,प्रा. मुप्पीडवार,प्रा.पोडे,प्रा.कु.ताकसांडे मॅडम,मांढरे सर,बावनकर सर,बोबडे सर,वासेकर सर,पाटील सर,आडे सर,मरसकोल्हे सर,कोंगरे सर,मेश्राम सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी सिताराम पिंपळसंडे, एस.एम.चन्ने,प्रेमचंद आदोळे इत्यादींचा सहयोग लाभला.
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti...
Shivaji Maharaj's birth anniversary should be celebrated at home like a festival...
                        --------//-------
                      
                 मुख्यसंपादक
              सै.मूम्ताज़ अली.
 मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या