गडचांदूर:-@Birthday news...
गडचांदूर येथील विद्यानगरीतील रहिवासी किशोर हजारे यांनी सौम्य किशोर हजारे या आपल्या मुलाचा चौथा वाढदिवस Fourth birthday येथील अनाथालयात साजरा केला आहे. समाजसेवेचा वसा घेतलेल्या हजारे कुटुंबाचे हे कार्य समाजापुढे आदर्श निर्माण करणारे ठरले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनाथालय बंद होते.यामुळे 2 वर्ष हे शक्य झाले नाही.एक दिवस का होईना पण आपल्यामुळे या मुलांना आनंद मिळावा हा यामागचा उद्देश असल्याचे मत हजारे कुटुंबांनी व्यक्त केले आहे. 'फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून' हजारे कुटुंबाच्या वतीने या मुलांना शालेय उपयोगी वस्तू,अल्पोपहार त्याचप्रमाणे अनाथालयासाठी अन्नधान्य व इतर वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या आहे.याप्रसंगी सदर बालसदनचे अधीक्षक,महिला कर्मचारी व समस्त मुला,मुलींची उपस्थितीती होती.घरी साजरा न करता अनाथ मुलांसोबत मुलाचा वाढदिवस साजरा केल्याने हजारे कुटुंबाचा सर्वत्र कौतुक होत आहे.
Child's birthday at the orphanage...
Child's birthday at the orphanage...

---------//--------
मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9095630811,9049358699.
सै.मूम्ताज़ अली.
मो.9095630811,9049358699.
0 टिप्पण्या