चंद्रपूर:-@Congress against Adani...
एलआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया LIC and State Bank of India या वित्तीय संस्थेत देशातील सर्वसामान्य,मध्यमवर्ग,नोकरदार,छोटे व्यापाऱ्यांनी आपला कष्टाचा,घामाचा पैसा गुंतवला आहे.परंतु,केंद्रातील मोदी सरकारने हा पैसा अदानींच्या कंपन्यांमध्ये जबरदस्तीने गुंतवला आहे.अदानी समूहातील गैरकारभारामुळे गुंतवणूक केलेले कोट्यवधी रूपये परत मिळतील का ? अशी भीती निर्माण झाली आहे.मोदी सरकारमुळेच सर्वसामान्यांचा पैसा धोक्यात आला,असा थेट आरोप चंद्रपूर शहर,जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू)तिवारी यांनी केला आहे.Common people's money is at risk due to Modi government Congress's Ritesh(Ramu)Tiwari alleges.6 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे देशभर आंदोलन पुकारले होते.याच पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील कस्तुरबा मार्गावरील स्टेट बँक ऑफ इंडिया State Bank of India च्या शाखेसमोर आयोजित आंदोलनात तिवारी बोलत होते.केंद्रातील मोदी सरकारने निवडक उद्योगपतींवर मेहरबानी दाखवत सामान्य माणसाचा कष्टाचा पैसा धोक्यात टाकला आहे. अदानी उद्योग समूहामध्ये एलआयसी lic चया 29 कोटी पॉलिसीधारक Policyholder व गुंतवणूकदार Investors यांचा 33 हजार कोटी रूपये,तर भारतीय स्टेट बँक आणि इतर बँकांतील 49 कोटी खातेदारांच्या 80 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.परंतु,अदानी समूहातील गैरकारभारामुळे देशभरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये हक्काचा पैसा परत मिळेल किंवा नाही,अशी भीती व्यक्त होत आहे. काँग्रेस पक्ष कोणत्याही उद्योगपतींच्या विरोधात नाही.परंतु,खास उद्योगपतींसाठी नियम बदलून जनतेचा पैसा धोक्यात घालण्यास विरोध आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच सामान्य जनतेच्या पाठिशी उभा राहिला आहे.अदानी उद्योग समूहातील गैरकारभाराची चौकशी व्हावी यासाठी काँग्रेस पक्ष संसदेत आवाज उठवत असल्याचेही यावेळी तिवारी यांनी सांगितले.अदानी समूहातील आर्थिक गैरकारभाराचा पर्दाफाश करणाऱ्या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी अथवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करावी,एलआयसी,स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर सरकारी वित्तीय संस्थांमधील अदानी समूहात केलेल्या मोठ्या गुंतवणूकीसंदर्भात संसदेत चर्चा व्हावी व गुंतवणुकदारांच्या पैशाला संरक्षण मिळावे यासाठी सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा,अशी मागणी करण्यात आली.यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.आंदोलनात जिल्हाध्यक्ष तिवारी यांच्यासह काँग्रेस प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय,काँग्रेस प्रदेश सचिव शिवा राव,माजी महापौर संगीता अमृतकर,बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी,युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर,कृउबास माजी सभापती दिनेश चोखारे,प्रकाश पाटील मारकवार ओबीसी आघाडीचे उमाकांत धांडे,ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे,अश्विनी खोब्रागडे,संगीता भोयर,सुनीता अग्रवाल,चंदाताई वैरागडे,विना खनके,सुनंदा धोबे,शालिनी भगत, कुणाल चहारे,ललिता रेवल्लीवार,प्रवीण पडवेकर, मनीष तिवारी,पिंटू शिरवार,संजय गंपावार,रमीज़ शेख,राजवीर यादव,राजू वासेकर,बापू अन्सारी, मोहन डोंगरे,सचिन कत्याल,प्रदीप डॉ,राजू रेवल्लीवार,मनोरंजन रॉय,वंदना भागवत,पप्पू सिद्दीकी,अमजद अली,भास्कर माकोडे,यश दत्तात्रय,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष ताजू भाई शेख, साबीर सिद्दीकी,नीलेश ठाकरे,मनोज खांडेकर, दुर्गेश कोडाम,ताज कुरेशी,सुभाष जुनघरे,नौशाद शेख,राहुल चौधरी,गौस खान,भानेश जंगम, रामकृष्ण कोंडरा,स्वप्निल चिवंडे,प्रकाश देशभ्रतकर,सौरभ ठोंबरे,अशोक गड्डमवार,युनूस कुरेशी,इम्रान शेख,अयुब खान,रवी भिसे,विजय धोबे,हाजी शेख,मुन्नी मुमताज शेख,अहमदी मुजीब कुरेशी,नसरीन मोहम्मद शेख,कादर शेख, इरफान शेख,अब्दुल अजी़ज़,अजिंक्य येरमे,मोनू रामटेके,विनोद वाघमारे,अभिजित वाटगुरे,राजेश वर्मा,वैभव रघाताटे,विनित डोंगरे,प्रवीण अडूर, आतीफ़ रझा यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Congress aggressive against Adani...
Common people's money is at risk due to Modi government Congress's Ritesh (Ramu)Tiwari alleges...
-------//------
0 टिप्पण्या