Subscribe Us

header ads

अकरावी कडून बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप.Farewell to the students of class XI to XII.

गडचांदूर:-@korpanalive news... 
    दरवर्षी प्रमाणे यंदाही गडचांदूर येथील सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय (कला,विज्ञान)यांच्या संयुक्त विद्यमाने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.यामध्ये वर्ग 11वीच्या विद्यार्थ्यांकडून 12 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.Farewell to the students of class XI to XII.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी.आर.काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोर्ड बारावीच्या परीक्षा संदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या.तसेच प्रमुख अतिथी म्हणून वर्ग 12 वीचे वर्ग शिक्षक प्राध्यापक खैरे, प्राध्यापक सैय्यद ज़हीर,प्राध्यापक झाडे, प्राध्यापिका ताकसांडे व सर्व वर्ग 11वीचे प्राध्यापक,प्राध्यापिका,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी 12 वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे नियोजन वर्ग 11 वीचे विद्यार्थी व वर्ग शिक्षकांनी केले.कार्यक्रम संपल्यावर लगेच सर्वांनी सुरूची भोजन आस्वाद घेतला  व 12 च्या विद्यार्थ्यांनी परिक्षेत भरभरून यश संपादन करावे,तसेच भविष्यातील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
Farewell to the students of class XI to XII...
                      --------//--------
                     
                  मुख्यसंपादक
                सै.मूम्ताज़ अली.
 मो.९०४९३५८६९९,९५९५६३०८११.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या