Subscribe Us

header ads

“मी नखाला नख घासलं,पण माझे केस”I brushed my nails,but my hair”

@Ajit Pawar...
     महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे.ते एखादा वक्तव्य करताना अगदी ठामपणे करतात,त्याच्या परिणामांची अजीबात चिंता करत नाही.जाहीर सभांमध्ये तर ते असे काही विनोदी वक्तव्य करतात, ज्यामुळे अनेकदा सभेत उपस्थितांचे हसून-हसून पुरता वाट लागते.असे असताना 6 फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथील शेतकरी मेळाव्यात दादांनी असे एक बिनधास्त वक्तव्य केले.ज्यामुळे उपस्थितांचे हसू अनावर झाले. लांबलचक केस हा सर्वांच्याच आवडीचा विषय असतो.दादा यांनी चक्क स्वतःच्या केसांवर विनोद केलेला आहे.यावेळी त्यांनी योगगुरू बाबा रामदेव यांचा नवा घेत पुन्हा एकदा विनोद केला.
  अजित पवार म्हणाले,त्या रामदेव बाबांचे ऐकून "तुम्ही नखाला नख कशाला घासता,ते रामदेव बाबाने सांगितले म्हणून करता.रामदेव बाबाने सांगितले नखाला नख घास,मी केला.पण,माझी सर्व केसं गेली.नवीन केस यायचे तर नावाच नाही. या बुवा लोकांचा काही ऐकू नका.साधू संतांचा ऐका,महापुरूषांचा ऐका,पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर,राजमाता जिजाऊ,सावित्रीमाई फुले, यांनी सांगितलेले विचार ऐका,मौलाना अबूलकलाम आझाद असतील,शाहू-फुले- आंबेडकर यासर्व महान लोकांचे ऐका.पण बुवाबाजी करणाऱ्यांचे ऐकू नका.नखाला नख घासून तिसरच काहीतरी व्हायचा.डॉक्टरकडे जावा लागला तर डॉक्टर म्हणेल हे कुणी करायला लावलं.पुन्हा डॉक्टरचा खर्च करावा लागेल" अजित पवारांनी हा किस्सा सभेत सांगताच कुणालाच हसू आवरता आले नाही.
i brushed my nails,but my hair..
Shut Pear told the story of Ramsey Baba...
                      --------//-------
मुख्यसंपादक सै.मूम्ताज़ अली.
मो.9049358699,9595630811

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या